मुंबई प्रतिनिधी । बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र कॉँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदा आता प्रदेश अध्यक्षांसह पाच कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून कॉंग्रेस पक्षाने ही नवी टीम जाहिर केली आहे.
आता महाराष्ट्रात काँग्रेसची धुरा मामा-भाच्याच्या हातात असणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, तर युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे आहेत. हे दोघेही राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात.
कार्याध्यक्ष पदी पुढील नेत्यांची वर्णी लागली आहे;
डॉ. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, श्रीमती यशोमती ठाकूर, मुज़फ्फर हुसैन.