मुंबई । स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील महाविकास आघाडीतील नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात ट्वीटर वॉर पाहायला मिळतं आहे. दरम्यान आता या ट्विटर वॉरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एंट्री मारली आहे. ”परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे सत्य स्वीकारून या मजुरांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यां ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत हे दुर्देवी आहे. त्यांनी ही आडमुठी भूमिका सोडून सहकार्य करावे” असा सबुरीचा सल्ला थोरात यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला आहे.
”महाराष्ट्राला 157 ट्रेनची आवश्यकता आहे, त्यातील 115 मुंबईत अपेक्षित आहेत. यापूर्वी रेल्वे उद्या किती ट्रेन देणार आहे हे कळवायचे आणि आम्ही त्यांना यादी द्यायचो. सध्या ईदचा सण असल्याने अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात आहेत त्यामुळे पियुष गोयल यांनी थोडे सबुरीने घ्यावे.” असंही थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे सत्य स्वीकारून या मजुरांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री @PiyushGoyalOffc
ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत हे दुर्देवी आहे. त्यांनी आडमुठी भूमिका सोडून सहकार्य करावे. pic.twitter.com/fLplYgFdqS— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 25, 2020
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र सरकारने मजुरांशी अमानवीय व्यवहार केल्याच्या आरोपाची थोरात यांनी चांगलाच समाचार घेतला. ”उत्तर प्रदेशातले सत्ताधारी रोजगार निर्माण करू शकले नाहीत म्हणून तिथले लोक महाराष्ट्रात येतात. आई सांभाळत नाही म्हणून मावशीकडे येतात. दोन महिने त्यांच्याकडे काम, पैसा नसताना मावशीने त्यांना व्यवस्थित सांभाळले. हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समजून घ्यावे,” अशी समज थोरात यांनी आदित्यनाथ यांना दिली.
लॉकडाऊनमध्ये २ महिने महाराष्ट्र शासनाने लाखो स्थलांतरित मजूरांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सांभाळले. त्यांनी घरी जायची इच्छा व्यक्त केल्याने मोफत प्रवासाची व्यवस्था केली. उत्तर प्रदेशात पोहोचल्यावर त्यांचे जे हाल होत आहे त्याकडे @myogiadityanath
यांनी लक्ष द्यावे.— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 25, 2020
महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात पोहचणाऱ्या मजुरांचे होत असलेल्या हलांवरून थोरात यांनी योगींना खडे बोल सुनावले. ”लॉकडाऊनमध्ये २ महिने महाराष्ट्र शासनाने लाखो स्थलांतरित मजूरांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सांभाळले. त्यांनी घरी जायची इच्छा व्यक्त केल्याने मोफत प्रवासाची व्यवस्था केली. रेल्वेतून जाताना त्यांना जेवणाचा डबा, पाणी देतोय, त्यांना सन्मानाने पाठवतोय, मात्र उत्तर प्रदेशात पोहोचल्यावर त्यांचे जे हाल होत आहेत त्याकडे योगी आदित्यनाथ यांनी लक्ष द्यावं ”,उगाच टीका करू नये असे देखील थोरात म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”