हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रात सध्या ट्विटर अकाउंट लॉक केले जात आहे. नुकतेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट लॉक झाल्यानंतर आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आले आहे. ट्विटर इंडियाकडून काँग्रेस नेत्यांवर ट्विटर लॉक करून कारवाई केली जात आहे.
सध्या राज्यातील ट्विटर अकाउंट लॉक करण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान नुकतेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट अनिश्चित काळासाठी लॉक करण्यात आले आहे. रणदीप सुरजेवाला यांच्या सह पाच वरिष्ठ नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटविरोधात कारवाई करण्यात आली सर्वत्र खळबळ माजली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईटच्या निमयांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटर कडून सांगण्यात येत आहे.
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ”मैं भी राहुल”असे ट्विट केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. सध्या राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांकडून केंद्र सरकारण जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. अशात वाढते पेट्रोल, गॅसचे दर यामुळे केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. महिनाभरापूर्वी महागाईवाढीमुळे केंद्र काँग्रेसने आंदोलन केले होते.