रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी; देशात इंजेक्शनच्या होणाऱ्या काळयाबाजारानंतर हा महत्त्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि त्याच्या औषधांच्या निर्यातीस केंद्र सरकारने बंदी घातली. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांच्या उपचारांमध्ये याचा उपयोग केला जातो. गेल्या काही दिवसांपासून, देशातील बर्‍याच भागात त्याची कमतरता व काळ्याबाजाराचे वृत्त आहे. यामुळे शासनाने इंजेक्शन आपल्या देखरेखीखाली ठेवण्याचाही मोठा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारने ट्वीट केले आहे की, रेमेडेसिव्हिर इंजेक्शन आणि ड्रग रेमेडिसिव्हिर उत्पादनाला लागणारे ‘अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएन्ट’ च्या निर्यातीला बंदी घातली आहे. देशात कोविड -19 ची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत हा आदेश लागू राहील. म्हणजे आपण आपल्या देशाची गरज योग्य रित्या भागवू शकू. निर्यात थांबवली तर याचा तुटवडा निर्माण नाही होणार. सरकारने म्हटले आहे की, आगामी काळात देशात रेमेडिसिव्हिर इंजेक्शनची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. औषधनिर्माण विभाग या इंजेक्शनच्या स्थानिक उत्पादकांशी संपर्क साधत आहे. त्यांना त्याचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्व उर्वरित मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सना त्यांचे स्टॉकिस्ट आणि वितरकांची संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्यांचा पुरवठा देशात वाढू शकेल. औषध तपासणी निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांना साठा करण्यापासून व काळाबाजार रोखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, रेमेडिसिव्हिर इंजेक्शनच्या सहज पुरवठ्यासाठी पुणे येथे एक नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. ज्यांना या इंजेक्शनची आवश्यकता आहे ते 020-26123371 किंवा टोल फ्री नंबर 1077 वर कॉल करू शकतात. हे नियंत्रण कक्ष 31 मेपर्यंत कार्यरत राहील.

Leave a Comment