डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाऊंडरने स्वतःच सुरू केले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल; कोविडसाठीही सुरू केला होता स्पेशल वॉर्ड

शिरूर | एका डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाऊंडरनेच एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एकूण 22 बेडचे असून गेल्या दोन वर्षापासून ते सुरू आहे. कंपाऊंडरने बोगस नाव आणि बनावट पदवी तयार करून हे हॉस्पिटल बांधले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे हॉस्पिटल चालवले जात होते. या हॉस्पिटलमध्ये विविध आजारांसाठी वेगवेगळे वार्ड तर कोविड आजारासाठी एक स्पेशल वार्ड सुरू करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो मूळचा नांदेडचा असल्याचे समजते. परिसरात प्रसिद्ध असलेले डॉक्टर बोगस असल्याचे समजताच परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला या बोगस प्रकरण बाबत माहिती मिळाली होती. पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील या नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे एमबीबीएस ची पदवी असल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता डॉ. महेश पाटील यांचे खरे नाव मेहबूब शेख असे असल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण चौकशी नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

You might also like