हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Medicine : केंद्र सरकारकडून लवकरच काही कफ सिरप आणि औषधांवर बंदी घातली जाऊ शकते. हे असे सिरप किंवा टॅब्लेट आहेत ज्यामध्ये एकापेक्षा जास्त औषधे वापरली जातात. त्यांना फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन (FDCs) असे म्हणतात. सामान्य भाषेत याला कॉकटेल मेडिसिन असेही म्हंटले जाते. हे लक्षात घ्या कि, अनेक विकसित देशांमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण करून तयार केलेल्या औषधांच्या विक्रीवर बंदी आहे. आता भारतानेही अशा 19 सिरप आणि टॅब्लेटची लिस्ट तयार केली आहे, ज्यावर लवकरच बंदी घातली जाऊ शकते.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसच्या मानसोपचार विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. एम.एस. भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीने केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटने बरोबर 19 FDC ची लिस्ट तयार केली. आता ही लिस्ट आरोग्य मंत्रालयाला देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ज्याबाबत लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.Medicine
बंदी का घातली जाणार आहे ???
एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण असलेल्या सिरप किंवा टॅब्लेटला FDC किंवा कॉकटेल मेडिसिन म्हणतात. अशा औषधांचे काही दुष्परिणाम देखील दिसून आले आहेत. तसेच एंटीबॉयोटिक कॉकटेलच्या जास्त वापरामुळे एंटीबॉयोटिक योग्य पणे काम न करण्याचा धोका देखील वाढला आहे. यामुळेच आता सरकारकडून कॉकटेल औषधांबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. Medicine
या औषधांवर घातली जाऊ शकते बंदी
या समितीने लिस्टेड केलेल्या 19 FDC मध्ये सुमो, निसिप, डी कोल्ड टोटल, विक्स ए क्शन 500 एडव्हान्स्ड, कफ सिरप टेडीकॉफ, ग्रिलिंक्टस, कोडीस्टार, टॉसेक्स, एस्कोरिल सी, पिरिटन एक्सपेक्टोरंट आणि अँटीबायोटिक क्लिंडामायसिन सारख्या औषधांचा समावेश आहे. या औषधांचे उत्पादन करणार्या फार्मा कंपन्यांमध्ये अल्केम, सिप्ला, रेकिट बेंकिसर, प्रॉक्टर अँड गॅम्बल, मॅनकाइंड फार्मा, एबॉट, ग्लेनमार्क आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांचा समावेश आहे. Medicine
काही औषधांना मिळू शकेल सूट
आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 19 FDC ची लिस्ट तयार केली गेली आहे, ज्यामध्ये बहुतेक कफ सिरपचा समावेश आहे. आता त्यावर बंदी घातली तर बहुतांश कफ सिरप बाजारातून निघून जातील आणि मार्केटमध्ये ब्रँडेड कफ सिरपचा तुटवडा निर्माण होईल. त्यामुळेच आता काही FDC ना सरकार सूट देण्याचा विचार करत आहे. दोन किंवा तीन मोठ्या कॉम्बिनेशन्सच्या विक्रीसाठी सवलत दिली जाऊ शकते. Tixylix Syrup आणि Corex सारख्या औषधांवर अद्याप तरी बंदी घातली जाणार नाही. Medicine
या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, ही कॉकटेल औषधे कोणत्याही विकसित देशात वापरली जात नाहीत. त्यामुळेच भारतही आता त्यावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने 2017 मध्ये तज्ञ समिती स्थापन केली होती. सरकार 2016 FDC फिल्टर करत आहे आणि आतापर्यंत 350 कॉकटेल औषधांवर बंदी घातली गेली आहे. Medicine
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cipla.com/home
हे पण वाचा :
Nazara Tech. च्या शेअर्सद्वारे मोठ्या कमाईची संधी, गेल्या 5 सत्रांमध्ये झाली 40 टक्क्यांनी वाढ
Kisan Credit Card द्वारे स्वस्त दराने कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज नरमाई !!! नवीन दर तपासा