हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटामुळे यंदाही केवळ मोजक्याच पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यावरून ह भ प बंडातात्या कराडकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. सोलापूरात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या सभेला गर्दी चालते पण पंढरपूर मध्ये वारकऱ्यांना येण्यास मज्जाव करत असल्याचा आरोप त्यांनी सरकार वर केला.
आषाढी एकादशीनिमित्त पायी वारीचा आग्रह धरणाऱ्या ह भ प बंडातात्या कराडकर यांना कराड जवळील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात स्थानबद्द केले आहे. तेथे त्यांनी देवाची पूजा करून नियमित कामास गुंतवून घेतले आहे. आषाढी वारीला जाता आले नसले असून सरकार एका बाजूला सोलापूर जिल्ह्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमांना चालते तर पंढरपूर मध्ये वारकऱ्यांना येण्यास मज्जाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
एका बाजूला जयंत पाटलांच्या सभेला गजमजाट तर दुसरीकडे पंढरपूर मध्ये शुकशुकाट अशी विसंगत भूमिका सरकारची आहे. असे त्यांनी म्हंटल. गेल्या वर्षी कोरणा चा प्रादुर्भाव होता मात्र यंदा या सरकारने बळजबरीचा वापर करत वारकऱ्यांना पंढरपुरात येऊ दिले नाही. दरम्यान, पंढरपूर येथील संचारबंदी संपल्यानंतर 24 जुलै नंतर ते पंढरपूरला दर्शनासाठी जाणार आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले. बंडातात्या यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत स्थान बद्दल ठेवले जाणार आहे.