Bandra Worli Sea Link Toll Hike : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून लागू होणार नवे दर

Bandra Worli Sea Link Toll Hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईकरांच्या खिशाला चाप बसणारी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरून प्रवास करणे आता महागणार आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोलच्या दरात आता १८ % वाढ (Bandra Worli Sea Link Toll Hike) करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) याबाबतचा निर्णय घेतला असून येत्या १ एप्रिलपासून प्रवाशांना नवे दर लागू होणार आहेत.

कोणत्या गाडीच्या टोलमध्ये किती वाढ होणार ? Bandra Worli Sea Link Toll Hike

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोलच्या दरात आता १८ % वाढ करण्यात आल्यानंतर (Bandra Worli Sea Link Toll Hike) कारचालकांना 85 रुपयावरून १०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या मिनी बस किंवा तत्सम वाहनांना आता130 रुपयावरुन १६० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच ट्रक आणि बसला १७५ रुपयांऐवजी २१० रुपये टोल द्यावा लागणार लागेल. या नव्या दरवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. हे नवीन टोल दर 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2027 दरम्यान लागू होतील.

एमएसआरडीसी’कडून दर तीन वर्षांनी रस्त्यावरील पथकरात वाढ केली जाते. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोलच्या दरासोबतच महाराष्ट्रातील पुणे ते सातारा महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्गावरील टोलमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. साधारण अडीच टक्क्यांनी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे.

वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूमुळे मुंबईतील दक्षिणी आणि पश्चिमी भाग जोडला गेला आहे. 2009 मध्ये वाहतुकीसाठी उद्घाटन करण्यात आलेल्या या सी लिंकमुळे मुंबईच्या वैभवात तर भर पडलीच परंतु पश्चिम उपनगरांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना या वांद्रे-वरळी सागरीसेतूमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सागरी सेतूमुळे प्रवाशांचा २० ते ३० मिनिटांचा वेळ वाचतो.