Baneshwar Temple : नसरापुरच्या हिरवाईत दडलंय पेशवेकालीन शिवमंदिर; प्रवेश करताच येतो दिव्य शक्तीचा अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baneshwar Temple) संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पुरातन तसेच प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. प्रत्येक मंदिरामागे एक आख्ययिका आहे. जी गेल्या अनेक पिढ्या सांगत आलुया आहेत. यातील बरीच मंदिरे सर्वश्रुत असली तरीही काही मंदिरे मात्र आजही निसर्गाच्या हिरवाईत दडलेली आहेत. असे असले तरीही या मंदिरांचा इतिहास आणि त्यांचे पावित्र्य त्या ठिकाणाची सकारात्मकता वाढवत आहे. अशाच एका मंदिराबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. या मंदिराचे नाव बनेश्वर मंदिर असून हे एक शिवमंदिर आहे. चला या मंदिराबाबत अधिक माहिती घेऊया.

कुठे आहे?

पुण्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आणि नसरापूरच्या हिरवाईत बनेश्वर मंदिर (Baneshwar Temple) वसलेले आहे. हे भगवान शंकराच्या भक्तीचे एक पवित्र स्थान असून हे मंदिर पेशवेकालीन आहे. त्यामुळे पेशवेकालीन वैभव आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो. या मंदिरात प्रवेश करताच एक अद्भुत शांतता आणि मुख्य म्हणजे दिव्य शक्तीचा अनुभव येतो. मंदिराच्या आसपासचा परिसर हा संपूर्ण झाडीने व्यापलेला आहे. त्यामुळे हे मंदिर हिरवाईत लपल्यासारखे वाटते.

बनेश्वर मंदिराचा इतिहास (Baneshwar Temple)

माहितीनुसार, इ.स. १७४९ मध्ये पेशवा बाळाजी बाजीराव यांनी बनेश्वर मंदिराची स्थापना केली. हे शिवमंदिर पेशव्यांच्या स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराची वास्तू तसेच सभामंडप, दीपमाळा आणि गर्भगृह एकंदरच संपूर्ण मंदिर पाहून पेशवेकालीन वैभवाची प्रचिती येते. या मंदिरातील महादेवाची पिंड मुख्य आकर्षण आहे. तसेच सभामंडपातील नंदीची भव्य मूर्ती आणि त्यावर कोरलेली कलाकुसर लासखा वेधण्यात सक्षम आहे. बनेश्वर मंदिराच्या आवारात जुनी पोर्तुगीज घंटा आहे. जी या मंदिराच्या इतिहासाची साक्ष देतो.

निसर्गरम्य परिसर

बनेश्वर मंदिराच्या आसपासचा संपूर्ण परिसर हा निसर्गाच्या हिरवाईने व्यापल्याचे दिसते. मंदिराच्या मागे कोसळणारा धबधबा पावसाळ्यात फारच सुंदर दिसतो. (Baneshwar Temple) काहीवेळा तो रौद्र रूप धारण करत असला तरी कडेला उभं राहून निसर्गाच्या अद्भुत दृश्यांचा अनुभव घेणे फारच आनंददायी वाटते. तसेच मंदिराच्या आसपास असलेल्या अभयारण्यात विविध प्रकारचे वृक्ष, वेली, फुले आणि पक्षी आढळून येतात. त्यामुळे न केवळ निसर्गप्रेमी तर पक्षी निरीक्षकांसाठी देखील ही जागा पर्वणी आहे.

इथे मिळेल मनःशांती

बनेश्वर मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे. मात्र, या मंदिराचा इतिहास, संस्कृती, स्थापत्यकला आणि निसर्ग यांचा संगम मनाला आल्हाददायी अनुभव देतो. येथे आल्यानंतर मिळणारी मानसिक शांतता शहराच्या गजबजाटात मिळणे जरा अवघडच. (Baneshwar Temple) त्यामुळे मनःशांती आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग शोधत असाल तर पुण्याजवळ असलेल्या या रमणीय स्थळाला जरूर भेट द्या.