Best Points To Visit In Matheran : सह्याद्रीच्या माथ्यावरील रान; पावसाळ्यात देते रिमझिम सरींचा आल्हाददायी अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Points To Visit In Matheran) येत्या काही दिवसात मान्सूनला सुरुवात होईल. मग उन्हाचे चटके नव्हे तर पावसाच्या सुखद सरींचा वर्षाव सुरु होईल. कडक उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा हा मनाला एक वेगळाच आनंद देतो. पावसाच्या पहिल्या सरीत जे सुख असत ते काही वेगळच असतं. पावसाच्या दिवसात फिरायला जायची मजा ही इतर कोणत्याही ऋतूत फिरायला जाण्यापेक्षा जास्त आनंददायी असते. काय मग? या पावसाळ्यात कुठे फिरायला जायचं याचं प्लॅनिंग झालं का? जर नसेल झालं तर हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात फिरण्यासाठी एका उत्तम ठिकाणाची माहिती देणार आहोत. जिथे पावसाळ्यात निसर्गाचे एक अनोखे आणि डोळ्यात साठवून ठेवावे असे रूप पहायला मिळते.

आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान. हे एक अप्रतिम आणि सुंदर निसर्ग दृश्यांनी वेढलेले हिल स्टेशन आहे. जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते. (Best Points To Visit In Matheran) पण पावसाळ्यात माथेरान फिरण्यात जी मजा आहे ती आणखी कुठेच नाही. सुंदर दऱ्या, वाहणारे धबधबे आणि शांत परिसर अनुभवण्यासाठी माथेरान एकदम बेस्ट. पण माथेरानमध्ये नेमकं कुठे फिरायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर पावसाळ्यात माथेरानमध्ये कोणते स्पॉट फिरायचे ते जाणून घेऊया.

1. पॅनोरमा पॉइंट

माथेरानमध्ये मुख्य बाजार पेठेपासून सुमारे ६ किमी अंतरावर असलेला ‘पॅनोरमा पॉइंट’ हा इथला सर्वात मोठा आणि लोकप्रिय पॉइंट आहे. इथून खंडाळा भीमशंकर पर्वत रांगा दिसतात. ज्या पावसाच्या आल्हाददायी वातावरणात आणखीच सुंदर दिसतात.

2. हार्ट पॉईंट (Best Points To Visit In Matheran)

जर तुम्हाला रात्रीची मुंबई कशी दिसते? हे पाहायचे असेल तर माथेरानच्या हार्ट पॉइंटला जरूर भेट द्या. माथेरानच्या हार्ट पॉईंटवरून तुम्ही अख्खी मुंबई पाहू शकता. मुख्य म्हणजे पावसात चिंब होणारी मुंबई पहायला काही वेगळीच मजा येते.

3. शार्लोट लेक

माथेरान पोस्ट ऑफिसपासून केवळ २ किमी अंतरावर असलेल्या शार्लोट लेकला जरूर भेट द्या. इथे तुम्हाला अद्भुत नैसर्गिक दृश्ये पाहता येतील. या तलावाच्या डाव्या बाजूला इको पॉइंट आणि लॉसा पॉइंट आहे.

4. द इको पॉईंट

माथेरानचा इको पॉइंट अत्यंत लोकप्रिय स्पॉट आहे. (Best Points To Visit In Matheran) या पॉइंटवर उभे असताना तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नाव ओरडून घेतलात तर इथले पर्वत तुमच्यासोबत तुमच्या जोडीदाराचे नाव घेतात. हा अनुभव फारच वेगळा आणि अद्भुत आहे.

5. लॉसा पॉइंट

पावसाळ्यात माथेरानला गेलात आणि इथला लॉसा पॉईंट पाहिला नाही तर काय पाहिलं माथेरान? कारण या पॉईंटच्या सौंदर्य येथील कोसळणाऱ्या धबधब्यांमध्ये आहे. जे पाहून मनाला विशेष आनंद मिळतो.

6. मंकी पॉइंट

माथेरानमध्ये मंकी पॉईंट नावाचे ठिकाण आहे. जिथे तुम्हाला प्रत्येक झाडावर लहान- मोठी माकडे पहायला मिळतील. (Best Points To Visit In Matheran) नैसर्गिक वातावरणात फिरणारी, खेळणारी आणि बागडणारी माकडे मस्ती करताना दिसतात. फक्त एव्हढंच की, त्यांच्यापासून आपलं सामान सांभाळून ठेवा.

माथेरानला कसे जाल?

तस पाहिलं तर संपूर्ण वर्षभर माथेरानला पर्यटकांची गर्दी असते. मात्र, पावसाळा माथेरान फिरण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. मुंबईपासून ९० किमी आणि पुण्यापासून १२० किमी अंतरावर असलेले माथेरान हे महाराष्ट्र सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण म्हणून केले आहे. त्यामुळे इथे वाहने जात नाहीत. इथे जायचे असेल तर तुम्हाला इतर वाहतूक मार्गांचा अवलंब करावा लागेल. मुंबईहून माथेरानला जाण्यासाठी आधी रेल्वेने नेरळला जा. (Best Points To Visit In Matheran) तिथून टॅक्सी करून दस्तुरीला पोहचता येईल. पुढे टॉय ट्रेनने फिरत येईल. फक्त लक्षात घ्या, पावसाळ्याच्या दिवसात कधी कधी टॉय ट्रेन बंद होऊ शकते.