बंगळूरू विमानतळ ठरले देशात भारी; तब्बल 528.3 कोटींचा केला फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातून इतर ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे अनेकजण हवाई वाहतुकीचा वापर करतात. आपला देश मोठा असल्याने देशात विमानतळांची संख्याही जास्त आहे. या सर्व विमानतळामध्ये बंगळूरू विमानतळाच्या (Bangalore Airport) सर्वाधिक नफा कमवला आहे. 2022-23 या वर्षात बंगळूरू विमानतळाने तब्बल 528.3 कोटींचा फायदा करत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे.

528.3 कोटींचा नफा

2022 -23 च्या दरम्यान बेंगळूरू विमानतळाने या वर्षात तब्बल 528.3 कोटींचा नफा कमवला आहे. असे केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तर देताना सांगितले. तसेच त्यांनी सांगितले की या कालावधीत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मोड अंतर्गत 14 विमानतळांपैकी फक्त तीनच विमानतळ नफ्यात होते.

कोणत्या विमानतळास कोणते स्थान आहे?

बेंगळूरू विमानतळाने 528.3 कोटींचा नफा कमवत पहिले स्थान निर्माण केले आहे. तर कोचीन विमानतळाने 267.1 कोटी रुपयांच्या नफ्यासह दुसरे स्थान मिळवले आहे. आणि 2022-2023 दरम्यान हैदराबादने 32.9 कोटी रुपयांच्या नफ्यासह तिसरे स्थान पटकवले आहे. दरम्यान, एकूण 125 संचलित विमानतळांपैकी कोलकत्ताने 482.3 कोटी रुपये मिळवले आहे. त्यानंतर चेन्नई – 169.5 कोटी रुपये, कालिकत – 95.3 कोटी, तिरुचिरापल्ली – 31.5 कोटी , कोईम्बतूर – 12.6 कोटी रुपये , भुवनेश्वर – 11.8 कोटी रुपये , चंदीगड –  9.5 कोटी , बागडोगरा – 2.7 कोटी , आसनसोल – 2 कोटी , लेह –  1.8 कोटी , कानपूर चकेरी – 1.4 कोटी रुपये आणि दरभंगा-1.1 कोटी रुपये मिळवले आहे.

कोणत्या विमानतळास झाला तोटा?

बेंगळूरू विमानतळास या कालावधीत फायदा झाला आहे. मात्र अहमदाबाद विमानतळाला सर्वाधिक तोटा झाला आहे. तो 408.51 कोटी रुपयांचा आहे. त्यानंतर दिल्ली विमानतळास 284.8 रुपयांचा तोटा झाला आहे. तर लखनौला 160.6 कोटी,  मोपा – 148.3 कोटी रुपये , कन्नूर – 131.9 कोटी रुपये , जयपूर 131.9 कोटी, मंगळुरु – 125.9 कोटी, तिरुवनंतपुरम – 110.1 कोटी , गुवाहाटी – 60.9 कोटी , दुर्गापूर – 9.1 कोटी आणि मुंबई एअरपोर्टला 1.04 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.