हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील सर्वोत्तम विमानतळपैकी एक असलेल्या बेंगलूरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळने (Kempegowda International Airport Bengaluru) स्वतःच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. जगातील पाच सर्वात वक्तशीर विमानतळामध्ये या विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सिरियम द्वारे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
विमानतळवरून मागीलवर्षी 31.91 दशलक्ष प्रवास :
बेंगलूरू शहरासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रदान करण्यासाठी शहरापासून 30 km अंतरावर हे विमानतळ केम्पेगौडा येथे बनवण्यात आले. विमानतळावर 4 km अंतराचे दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे रनवे बांधण्यात आलेले आहेत.आपल्या सर्वोत्तम सेवासाठी हे विमानतळ ओळखले जाते. मागील आर्थिक वर्षात (2022-2023 ) मध्ये या विमानतळवरून 31.91 दशलक्ष लोकांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. यानंतर आता मागील तीन महिन्यात सर्वात वक्तशीर विमानतळ असलेल्या पाच विमानतळात केम्पेगौडा विमानतळाची नोंद झाली आहे.
मागील तीन महिन्याचे आकडे बघायला गेले तर विमानाच्या वेळेवर निर्गमनांच्या बाबतीत ( departure ) प्रभावी ट्रॅक रेकॉर्डसह – जुलैमध्ये 87.51 टक्के, ऑगस्टमध्ये 89.66 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 88.51 टक्केसह केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पाचव्या स्थानावर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत जागतिक वक्तशीरतेमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणाऱ्या इतर विमानतळांमध्ये सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद, मिनियापोलिस-सेंटर, पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे.