नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशचा दिग्गज फलंदाज तमीम इक्बालने (tamim iqbal) रविवारी जवळपास 15 वर्षे फॉरमॅट खेळल्यानंतर त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजला 3-0 व्हाईटवॉश केल्यानंतर 33 वर्षीय तमीम इक्बालने (tamim iqbal) फेसबुक पोस्ट करत आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. बांगलादेशने गयाना येथे झालेल्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा चार गडी राखून पराभव केल्यावर लगेचच तमिमने (tamim iqbal) ही घोषणा केली.
तमीम इक्बालने सप्टेंबर 2017 मध्ये टी-20 मध्ये बांगलादेशकडून पदार्पण केले.त्याने आतापर्यंत बांगलादेशसाठी 78 T20 खेळले आहेत. यामध्ये त्याने 116.96 च्या स्ट्राइक रेटने 1,758 धावा केल्या आहेत. तो दोन वर्षांपूर्वी मार्च 20202 मध्ये मीरपूरमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा T20I आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. T20I मध्ये शतक झळकावणारा तमिम (tamim iqbal) हा एकमेव बांगलादेशी फलंदाज आहे. भारतात झालेल्या T20 विश्वचषक 2016 मध्ये ओमानविरुद्ध त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. सध्याचा कर्णधार महमुदुल्लाह रियाद आणि कसोटी कर्णधार शकिब अल हसन यांच्यानंतर आपल्या देशासाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
तमीम इक्बाल (tamim iqbal) हा डावखुरा फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय T20 मधून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो बांग्लादेशासाठी वनडे आणि कसोटी खेळणार आहे. तो बांग्लादेशाकडून वनडे क्रिक्रेटमध्ये 8000 धावा करणारा आपल्या देशाचा पहिला फलंदाज होण्यापासून फक्त 57 धावांनी मागे आहे. त्याने आत्तापर्यंत 14000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत ज्यात 25 शतके आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर