Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. या दरम्यानच आता खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक आणि फेडरल बँकेने देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. दोन्ही बँकांनी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर वाढवले ​​आहेत. नवीन दर 18 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत.

Why Federal Bank will continue to outperform

फेडरल बँकेचे व्याज दर

फेडरल बँकेकडून 6 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 5.25 टक्के व्याजदर दिला जात आहे. त्याच वेळी, 9 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 4.80 टक्के दराने व्याज दिले जात आहे. याशिवाय एका वर्षाच्या FD वर 5.45 टक्के व्याजदर तर 2 वर्ष मुदतीच्या FD वर 5.75 टक्के दराने व्याज दर मिळेल. त्याचबरोबर बँकेकडून 750 दिवसांच्या FD वर 6 टक्के दराने तर 2222 दिवस आणि 75 महिन्यांच्या FD वर 5.95 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच 750 दिवस किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या FD वर आता 6.00 टक्के व्याजदर असेल आणि 3 ते 6 वर्षांच्या मुदतीच्या डिपॉझिट्सवर 5.75 टक्के दराने व्याज दर मिळेल. Bank FD

IDFC First Bank ने फिक्स्ड डिपॉजिट की ब्याज दरों में किया बदलाव, फटाफट चेक करें नई दरें | TV9 Bharatvarsh

IDFC फर्स्ट बँकेचे व्याज दर

IDFC फर्स्ट बँकेकडून 500 दिवसांपासून ते 2 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 6.5 टक्के व्याजदर मिळेल. बँकेच्या ग्राहकांना आता 3 वर्षे एक दिवस ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 6.25 टक्क्यांऐवजी 6.50 टक्के दराने व्याज दर दिला जाईल. Bank FD

Fixed Deposit (FD): If you are planning to get FD, then keep these 5 things in mind including laddering and short term FD, it will benefit more - Business League

अलीकडेच एसबीआय, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी देखील आपल्या FD वरील दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकाकडून हे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/personal-banking/deposits/fixed-deposit

हे पण वाचा :

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

SBI ने ग्राहकांसाठी सुरु केली Whatsapp बँकिंगची सुविधा !!!

Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा कमाईची संधी !!!

Canara Bank कडून FD वरील व्याज दरात बदल !!! नवीन दर तपासा

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज Ben Stokesची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

Leave a Comment