हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय ठरला आहे. हे सुरक्षित असून यावर खात्रीशीर रिटर्न देखील मिळतो. ज्यामुळे लोकं खूप विश्वासाने आपले भांडवल FD मध्ये गुंतवतात. कारण यामध्ये पैसे बुडण्याची भीती नाही. मात्र, असे असले तरीही FD वर मिळणार रिटर्न तसा पहिला तर कमीच आहे. तर आज आपण FD वर 7 टक्के किंवा त्याहून जास्त व्याज देणाऱ्या बँकांबाबतची माहिती जाणून घेउयात…

Axis Bank – या लिस्टमध्ये Axis या खाजगी बँकेचा देखील समावेश आहे. या बँकेकडून सामान्य नागरिकांना 2 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 7% व्याज दिले जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व व्याजदर 2 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमीच्या डिपॉझिट्ससाठी असतील. Bank FD Rates

ICICI Bank – देशातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी बँक असलेल्या ICICI कडून 15 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर ग्राहकांना 7% व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते आणखी जास्त असू शकेल. Bank FD Rates

Punjab National Bank – ही बँक सर्वसामान्य नागरिकांना 666 दिवसांच्या FD वर 7.25% व्याज देत आहे. या बँकेने नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेलाच एफडीवरील व्याज दर वाढवले आहेत. Bank FD Rates

Canara Bank – या बँकेकडून सामान्यतः FD वर 3.25 टक्के ते 6.50 टक्के व्याज दिले जात आहे. मात्र या बँकेकडून 666 दिवसांच्या कालावधीच्या FD वर 7 टक्के व्याज दिले जात आहे. Bank FD Rates

Bank Of Baroda – या सरकारी बँकेकडून त्यांच्या स्पेशल एफडी ‘तिरंगा प्लस एफडी स्कीम’ अंतर्गत 7.05% व्याज मिळत आहे. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना याहून जास्त व्याज मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/personal-banking/accounts/term-deposit/fixed-deposit
हे पण वाचा :
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट
Car च्या डिक्कीत ठेवा ‘हे’ Device; पंक्चर टायर एका मिनिटांत होईल ठीक
‘या’ Penny Stock ने गेल्या 20 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात केली 150 पटींनी वाढ




