Bank FD : ‘या’ बँकेने लाँच केली स्पेशल FD स्कीम !!! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 8.40 % व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये जमा करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (Unity Bank) ने गुंतवणूकदारांसाठी एक स्पेशल स्कीम एफडी लाँच केली आहे. RBI कडून रेपो दरात नुकतेच वाढ आली आहे. यानंतर नंतर सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे नाव आहे – शगुन 501. या स्पेशल एफडी योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी 501 दिवसांचा असेल. या योजनेत बँकेकडून रिटेल ग्राहकांना 7.90 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.40 टक्के व्याज दिले जाईल. मात्र यामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंतच गुंतवणूक करता येईल.

Decks cleared for amalgamation of PMC Bank with Unity Small Finance Bank | ummid.com

हे लक्षात घ्या कि, या वर्षी मे पासून RBI कडून रेपो दरांमध्ये 4 वेळा वाढ केली गेली आहे. ज्याच्या परिणामी FD वरील व्याजदर आणखी आकर्षक झाले आहेत. RBI ने 30 सप्टेंबर रोजी देखील रेपो दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. या वाढीचे अनेक बँकर्सनी स्वागत केले आहे. Bank FD

युनिटी बँकेने एक ट्विट करून म्हटले की, “यावेळचा दसरा आणि दिवाळी, युनिटी बँकेच्या 501दिवसांच्या FD सह शुभशकून सुरू करूयात. युनिटी बँकेच्या 501 दिवसांच्या FD वर मर्यादित कालावधीच्या ऑफरसह हा प्रसंग साजरा करा आणि 7.9% पीए पर्यंत कमवा. ज्येष्ठ नागरिक वार्षिक 8.4% पर्यंत कमाई मिळेल.” Bank FD

रेपो दर 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर आणला आहे. जो गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलले गेले आहे. याआधीही रेपो दरात मे महिन्यात 0.40 टक्क्यांनी तसेच जून आणि ऑगस्टमध्ये मिळून 0.50-0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. मे पासून आत्तापर्यंत RBI ने रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली गेली आहे. Bank FD

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

‘या’ बँकांनी वाढवले ​FD चे दर

अलीकडेच RBL बँक, Axis बँकांनी देखील FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://theunitybank.com/

हे पण वाचा :

DCB Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे ताजे दर तपासा

Axis Bank ने आपल्या FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर तपासा

‘या’ Multibagger Stock मध्ये पैसे गुंतववून गुंतवणूकदारांनी कमावला कोट्यावधींचा नफा !!!

Gold Price : सोने-चांदी महागले, या आठवड्यात सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते पहा