हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता सणासुदीचा हुंगाम सुरु होतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येतात. ज्यामुळे याला सणांचा महिना म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी तसेच स्वातंत्र्य दिन सारखे मोठे सण आहेत. नुकतेच RBI कडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची(Bank Holiday) लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये बँकेशी संबंधित काही काम असेल तर आपल्या बँकेच्या सुट्ट्यांची (Bank Holiday) माहिती जाणून घ्या. जेणेकरून तुम्हांला आपले काम वेळेत करता येईल.
इथे हे लक्षात घ्या की, या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू होणार नाहीत. RBI च्या अधिकृत वेबसाइटवरील सुट्ट्यांच्या लिस्टनुसार, बँकांच्या या सुट्ट्या प्रत्येक राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगांवर देखील अवलंबून असतात. प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या (Bank Holiday) असतील.
बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट खालीलप्रमाणे :
1 ऑगस्ट 2022 – द्रुपका शे-जी उत्सव (गंगटोकमध्ये बँका बंद राहतील)
7 ऑगस्ट 2022 – पहिला रविवार
8 ऑगस्ट 2022 – मोहरम (जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल)
9 ऑगस्ट 2022 – चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलाँग वगळता देशभरात बँका बंद राहतील.
11 ऑगस्ट 2022 – रक्षाबंधन (अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, जयपूर शिमल्यामध्ये सुट्टी असेल)
12 ऑगस्ट (कानपूर लखनऊमध्ये बँका काम करणार नाहीत)
13 ऑगस्ट 2022 – दुसरा शनिवार
14 ऑगस्ट 2022-रविवार
15 ऑगस्ट 2022 – स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट 2022 – पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये बँकेला सुट्टी)
18 ऑगस्ट 2022 – जन्माष्टमी (भुवनेश्वर, कानपूर, डेहराडून, लखनौ येथे बँकांना सुट्टी असेल)
19 ऑगस्ट 2022 (अहमदाबाद, भोपाळ चंडीगड चेन्नई गंगटोक, जयपूर जम्मू, पाटणा रायपूर रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील)
हैदराबादमध्ये 20 ऑगस्टला बँका बंद राहतील.
21 ऑगस्ट 2022 – रविवार.
28 ऑगस्ट 2022-रविवार.
29 ऑगस्ट (गुवाहाटीमध्ये सुट्टी).
21 ऑगस्ट 2022 – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील). Bank Holiday
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण !!! नवीन भाव तपासा
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये कमी खर्चात मिळवा जास्त फायदे !!!
EPFO : ईपीएफ-पीपीएफमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
Part Time Job : दररोज फक्त 1 तास काम करून दरमहा करा हजारो रुपयांची कमाई !!!
Banking Service: 1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित ‘या’ नियमात होणार बदल !!!