कॉम्पुटर वरील सततच्या Typing मुळे हात दुखतोय?? ‘हे’ उपाय करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तुम्ही जर कोणत्याही ऑफिस मध्ये काम करत असाल तर तुम्हाला ८ ते ९ तास कम्प्युटर वर काम करावं लागत. एवढा वेळ सलगपणे काम करणं हे म्हणावं तेवढं तेवढं सोप्प नसत. कॉम्पुटर वर सततच्या टायपिंगमुळे तुमच्या हाताला, पाठीला, तसेच मानेला वेदना होण्याची शक्यता असते. यासाठी नेमका काय उपाय करावा हे आज आपण जाणून घेऊया.

खुर्चीची उंची फिक्स करा-

सर्व प्रथम, कॉम्पुटर वर काम करण्यासाठी आरामदायी खुर्चीचा वापर करावा. तसेच बसण्यापूर्वी त्या खुर्चीची उंची आपल्या उंचीप्रमाणे फिक्स करावी. जेणेकरून टाइपिंग करताना आपले दोन्ही खांदे आरामशीर राहतील. अन्यथा तुम्हाला खांदेदुखी आणि हातदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो.

पाठ नेहमी सरळ ठेवणे-

जेव्हा तुम्हाला सलग काही तास कॉम्पुटर वर काम करावे लागत तेव्हा तुम्ही स्थिर आणि पाठ सरळ ठेऊन बसणं आवश्यक आहे. जर तुम्ही कसेही बसलात किंवा वाकून बसला तर तुम्हाला मान, आणि पाठीचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे बसताना मान, पाठीचा कणा सरळ ठेवा.

कॉम्पुटर थोडा दूर ठेवा-

कॉम्पुटर वर काम करत असताना त्याची स्क्रीन २० इंच तरी दूर ठेवा. काही वेळा काहीजण कॉम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये घुसून काम करतात. मात्र यामुळे डोळ्यांनाही इजा होण्याची शक्यता असते. तसेच कॉम्पुटर स्क्रीन तुमच्या डोळ्यांच्या लेव्हल वर असावी जेणेकरून बसताना पॉश्चर खराब होणार नाही.

अधून मधून ब्रेक घ्या-

जर तुम्ही सतत काही तास सलगपणे काम कराल तर तुमचे हात, बोटे दुखण्याची शक्यता असते. त्यामुळे दर अर्धा किंवा एका तासाने थोडी रेस्ट घ्यावी. त्यावेळेत दुसरे कोणते काम असेल ते करणे उत्तम. यामुळे तुमच्या हातांना आवश्यक असा ब्रेक मिळेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.