Bank Holiday In August 2023 । भारतीय रिझर्व बँकेकडून प्रत्येक वर्षी सरकारी बँकांच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात येते. या कॅलेंडरनुसार, एका विशिष्ट तारखांदिवशी या बँका बंद ठेवल्या जातात. या बँका बंद ठेवण्यामागे काही स्थानिक कारणे तर सरकारी सुट्ट्या असतात. यावर्षीच्या कॅलेंडरनुसार, ऑगस्ट महिन्यात बँकांना 14 दिवसांची सुट्टी पडली आहे. त्यामुळे बँकेत तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर लवकरात लवकर उरकून घ्या तसेच बँकेत जाताना सुट्ट्यांची माहिती काढूनच जा.
ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक सणवार आले आहेत. त्यामुळे निवडक राज्यांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही बँका तेंडोंग लो रम फाट पारशी नववर्ष, ओणम, रक्षाबंधन आणि इतर प्रसंगी बँकां बंद राहील. काही तातडीच्या कारणांसाठी बँका उघडण्यात आल्या तर त्याची माहिती इंटरनेट बँकिंग सेवेद्वारे खातेधारकांपर्यंत पोहोचवण्यात येते. ऑगस्ट महिन्यात १४ दिवस सुट्ट्या असल्याने बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मात्र बल्ले बल्ले आहे. ऑगस्ट मध्ये कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहतील (Bank Holiday In August 2023) हे आपण खाली सविस्तरपणे पाहूया.
ऑगस्ट मध्ये ‘या’ दिवशी बँक बंद – Bank Holiday In August 2023
येत्या 1 ऑगस्ट रोजी रविवार आला असून त्या दिवशी आठवड्याची पहिली सुट्टी आली आहे. 8 ऑगस्टला तेंडोंग लो रम फाट सन आल्यामुळे या तारखेला गंगटोकमधील बँका बंद राहतील. तर 12 ऑगस्ट रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आला असल्यामुळे ही बँका बंद असतील. लगेच 13 ऑगस्ट महिन्याचा दुसरा रविवार आल्यामुळे त्याची सुट्टी बँकांना असेल.
त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन असल्यामुळे त्याची सार्वजनिक सुट्टी बँकांना असेल. 16 ऑगस्ट रोजी पारशी नववर्ष सुरू होणार असल्यामुळे बेलापूर, मुंबई आणि नागपूरमधील बँका बंद राहतील. 18 ऑगस्ट रोजी श्रीमंत शंकरदेव तिथी आल्यामुळे गुवाहाटी येथील बँका बंद असतील. 20 ऑगस्ट रोजी तिसरा रविवार आला असल्याने तेव्हा ही बँका बंद असतील. पुढे, 26 ऑगस्ट रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने तेव्हाही बँकांना सुट्टी असेल. तर 27 ऑगस्ट रोजी महिन्याचा चौथा रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. 27 ऑगस्ट रोजी महिन्याचा चौथा रविवार आल्यामुळे तेव्हाही बँका बंद असतील. 28 ऑगस्ट रोजी पहिला ओणम सन साजरा करण्यासाठी कोची, तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
याचबरोबर, 29 ऑगस्ट रोजी तिरुवोनम साजरा करण्यासाठी कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद (Bank Holiday In August 2023) ठेवण्यात येतील. 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सन आल्यामुळे जयपूर आणि श्रीनगरमधील बँकांना सुट्टी असेल. 31 ऑगस्ट रोजी रक्षा बंधन, श्री नारायण गुरु जयंती आणि पंग-लॅबसोल आल्यामुळे गंगटोक, डेहराडून, कानपूर, कोची, लखनऊ आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद असतील. या सर्व तारखांसाठी वेगवेगळ्या ठिकाणातील बँका बंद असतील.