मोडखळीस आलेल्या ST चा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य सरकारची “निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान” अशा मथळ्याची जाहिरात सर्वत्र झळकताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवर देखील या जाहिरातींचे पोस्टर पाहिला मिळत आहेत. त्यामुळे या जाहिरातींवर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच राज्य सरकार महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष न देता जाहीरात करत असल्याचे देखील विरोधकांकडून म्हटले जात आहे. यादरम्यानच परिवहन महामंडळाच्या एका बसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही बस पूर्णपणे मोडखळीत आली असताना देखील या बसवर राज्य सरकारची जाहिरात चिकटवण्यात आली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारवर निशाणा साधत, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राज्य सरकारकडून एसटीचा केवळ जाहिरातबाजीसाठी वापर केला जात असल्याची टीका केली आहे.

याबाबत रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या बसचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच राज्य सरकारवर टीका करत, जेव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांना वरचढ होत संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो. तेव्हा विकास मात्र हरवतो. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ST महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय गतिमान आणि महाराष्ट्र वेगवान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून ST चा वापर केला जात असल्याने मूलभूत प्रश्नांकडं मात्र दुर्लक्ष होत असल्याचं या फोटोवरुन दिसत असल्याचं म्हटले आहे.

मोडखळी झालेल्या आणि दुरवस्था झालेल्या या बसचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. बसची अशी स्थिती असताना नागरिक त्यामधून सुरक्षित प्रवास कसा करू शकतात असा अहवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच आधार रोहित पवार यांनी देखील या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच कर्जत जामखेडमधील MIDC प्रकरणी आमदार रोहित पवार राज्य सरकारवर आक्रमक झालेले पाहिला मिळाले.