हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता लवकरच मार्च महिना सुरु होणार आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बँकिंग क्षेत्रासाठी या महिन्याचे विशेष महत्व आहे. मार्च महिना हा प्रत्येक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यांत गेल्या वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाचा तपशील किंवा हिशेब 31 मार्चपर्यंत द्यावा लागेल. तसेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष देखील सुरू होत आहे. आता 1 मार्चपासून अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मार्च महिन्यातच होळीसहीत इतरही अनेक सण असल्यामुळे बँकांनाही या महिन्यात अनेक सुट्या असणार आहेत. अशा परिस्थितीत जर आपण बँकेत काही कामानिमित्ताने जाणार असाल तर सुट्ट्यांची लिस्ट तपासा.
हे जाणून घ्या कि, मार्च महिन्यात या वर्षी बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. RBI ने सुट्ट्यांची लिस्ट जाहीर केली आहे. यावेळी सर्व बँका RBI ने अधिकृतपणे सूचित केलेल्या सुट्ट्यांच्या दिवशी बंद राहतील. इथे हे जाणून घ्या कि, सुट्ट्यांच्या दिवशी बँकांच्या शाखा बंद असल्या तरीही अनेक बँकिंगची कामे डिजिटल पद्धतीने करता येतील. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर या सुट्ट्यांच्या कोणताही परिणाम होणार नाही. तसेच या दरम्यान एटीएममधून पैसे काढतानाही ग्राहकांना कोणतीही अडचण भासणार नाही. ही सुविधा 24 तास सुरु राहणार आहे. Bank Holiday
मार्च महिन्यातील सुट्ट्यांची लिस्ट तपासा (Bank Holiday)
मार्च 03 – चपचार कुट (आयझॉल, मिझोरम)
05 मार्च – रविवारी बँका बंद राहतील
मार्च 07 – होलिका दहन/धुलंडी/डोल जत्रा (बेलापूर, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद – तेलंगणा, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, पणजी, रांची आणि श्रीनगर प्रदेश)
मार्च 08 – होळी – धुलेती/यासंग दुसरा दिवस (अगरताळा, अहमदाबाद, ऐझॉल, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनौ, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला,
मार्च 09 – होळी (पाटणा)
11 मार्च – दुसरा शनिवार
12 मार्च – रविवारी बँका बंद राहतील
19 मार्च – रविवारी बँका बंद राहतील
22 मार्च – गुढी पाडवा / उगादी सण / बिहार दिवस / साजिबू नोंगमापनबा (चेरोबा) / तेलुगु नववर्ष दिवस / पहिली नवरात्री (बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद – तेलंगणा, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा, श्रीनगर)
25 मार्च – चौथा शनिवार
26 मार्च – रविवारी बँका बंद राहतील
30 मार्च – श्री राम नवमी – (अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद – तेलंगणा, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची, शिमला). Bank Holiday
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 50 लाख रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत संमिश्र कल, तपासा आजचे नवे भाव
आपल्या Pan Card चा गैरवापर तर झाला नाही ना ??? घरबसल्या अशा प्रकारे तपासा
बाजारात धुमाकूळ घालायला येतोय OnePlus चा ‘हा’ स्वस्त फोन, असे असतील फीचर्स
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया