हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : जून महिन्यापासून अनेक आर्थिक बदल करण्यात आले आहेत. यासोबतच रिझर्व्ह बँकेकडून देशातील बँकांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची लिस्ट देखील जारी केली गेली आहे. इथे हे लक्षात घ्या कि, या लिस्टनुसार यावेळी जूनमध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुमचे बँकेत एखादे काम असेल तर या महिन्याच्या सुट्ट्यांची लिस्ट पाहून ठेवा.

RBI ने जारी केलेल्या चार्टनुसार, जूनमध्ये शनिवार-रविवार सोडून आणखी 6 दिवस बँका बंद राहतील. बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असल्याने रविवार आणि शनिवारी मिळून जूनमध्ये 6 सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्या केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाच नाही तर खाजगी, परदेशी, सहकारी आणि प्रादेशिक बँकांनाही लागू असतील. RBI कडून जारी करण्यात येणारी सुट्ट्यांची लिस्ट सर्वच राज्यांतील सर्व बँकांना समान रीतीने लागू होते. मात्र यातील काही सुट्ट्या या फक्त काही राज्यांनाच लागू होतात. Bank Holidays

आणखी कोणकोणत्या तारखांना सुट्टी असेल ते जाणून घ्या…
2 जूनला महाराणा प्रताप जयंती आणि तेलंगण स्थापना दिवस आहे. यानिमित्त हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तेलंगणामध्ये बँका बंद राहणार आहेत.
3 जून हा श्रीगुरु अर्जुन देवजींचा हुतात्मा दिवस असून या दिवशी फक्त पंजाबमध्ये बँका बंद राहतील.
14 जून रोजी संत गुरू कबीर यांच्या जयंतीनिमित्त हिमाचल प्रदेश, चंदीगड, हरियाणा, पंजाब आणि ओडिशामध्ये सुटी असणार आहे.
15 जून हा राजा संक्रांती आणि गुरु हरगोविंदजींचा जन्मदिवस आहे. त्यामुळे ओडिशा, मिझोराम, जम्मू-काश्मीरच्या बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
त्रिपुरामध्ये 22 जून रोजी खर्ची पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत.
30 जून रोजीही फक्त मिझोरममध्ये रेमनानी सणानिमित्त बँकांना सुटी असेल. Bank Holidays

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
PNB ने आपल्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
LPG Price : व्यावसायिक गॅस सिलेंडर 136 रुपयांनी स्वस्त !!! घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही
Gold Price Today : सोन्या-चांदीचे भाव घसरले, आजचे नवीन दर पहा
Investment Tips : वयाच्या 40 नंतर भविष्यासाठी गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या




