Investment Tips : वयाच्या 40 नंतर भविष्यासाठी गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : अनेक लोकं वयाची विशी ओलांडण्यानंतर पैसे कमावण्यास सुरवात करतात आणि वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवात करतात. आता चाळीशीनंतर गुंतवणूक करण्यामध्ये सर्वात मोठी अडचण अशी येते की, जवळपास 15-20 वर्षे काम करूनही आपल्या हाती बचत म्हणून काहीच लागत नाही. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकं माहिती न घेता चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि स्वतःवरील बोझा वाढवतात.

मात्र, हे लक्षात घ्या कि, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर गुंतवणूक सुरु करणे हे वाटते तितके अवघड नाही. साहजिकच गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला थोडा उशीर नक्कीच झालेला आहे. मात्र त्यासाठी इतकाही उशीर झालेला नाही की आपल्याला रिटायरमेंट साठी बचत करता येणार नाही. त्यामुळे घाबरून न जाता शांत डोक्याने नियोजन करणे केव्हाही चांगले…

All you need to know about Fund of Funds (FoFs)? - The Economic Times

40 च्या पुढे गुंतवणुक करण्यामध्ये काही गोष्टी तुमच्या बाजूने आहेत

अर्थातच, चाळीशी मध्ये आपण गुंतवणुक करण्यामध्ये आपण थोडे मागे असलो तरीही यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या बाजूने राहू शकतात. यातील पहिली गोष्ट म्हणजे चाळीशी मध्ये आपला पगार हा 23-24 वयोगटाच्या तुलनेत खूप जास्त असेल. म्हणजेच, आता आपल्याला बचतीवर जास्त पैसे खर्च करता येतील. याशिवाय आपल्याकडे गुंतवणुकीसाठी आणखी 15-20 वर्षे असतील. त्यामुळे जास्त गुंतवणूक करून आपल्याला तेवढ्याच वेळेत चांगले पैसे जमा करता येतील. Investment Tips

वाढत्या पगाराबरोबरच गुंतवणूक देखील वाढवा

जसजसे आपला पगार वाढेल तसंतशी आपण गुंतवणूक देखील वाढवली पाहिजे हे लक्षात घ्या. आपण जर SIP करत असाल तर त्यामध्ये दरवर्षी थोडीथोडी वाढ करा. असे करून भविष्यात आपला पोर्टफोलिओ जबरदस्तरीत्या वाढेल. याशिवाय, आपल्या बोनसचा काही भाग आणि इतर इन्सेन्टिव्ह देखील सतत गुंतवत रहा. मात्र इथे सर्वांत महत्वाची गोष्ट अशी कि, आपल्याला रिटर्नपेक्षा बचतीवर जास्त भर द्यावा लागेल. Investment Tips

Where can I invest Rs 35 lakh for three years? - The Economic Times

गुंतवणूक कुठे करावी ???

आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक किंवा दोन लॉर्ड कॅप इंडेक्स सामील करा. यासाठी आपण निफ्टी किंवा सेन्सेक्सवर आधारित कोणताही फंड निवडू शकता. तसेच आपल्याला या दोन्ही इंडेक्सवर आधारित 1-1 फंड देखील निवडता येईल. याशिवाय आपल्याला मिडकॅप फंड, इंटरनॅशनल फंड आणि सोन्यामध्ये देखील गुंतवणूक करता येईल. Investment Tips

आर्थिक सल्लागाराची मदत घ्या

20-30 वयामध्ये जोखीम घेता येयेते. मात्र 40 नंतर, प्रयोग करण्याऐवजी योग्य आर्थिक सल्लागाराकडून मदत घ्या.

Mutual Fund Portfolio Examples for 3 Types of Investors

अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/complete-guide-investing

हे पण वाचा :

IRCTC : 35 रुपयांसाठी दिला 5 वर्षे लढा, आता रेल्वेकडून मिळणार अडीच कोटी रुपयांची भरपाई !!!

FD Rates : आता ‘या’ NBFC च्या स्पेशल FD वर मिळणार 7.45% व्याज !!!

Inflation : होम लोनपासून ते इन्शुरन्सपर्यंत जूनमध्ये ‘या’ गोष्टींसाठी मोजावे लागणार जास्त पैसे !!!

Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती !!!

आता घरबसल्या PAN Card वरील फोटो कसा बदलावा हे समजून घ्या !!!

Leave a Comment