Bank Holidays: बँका पुढे 8 दिवस बंद राहतील, कोरोना काळामध्ये घर सोडण्यापूर्वी ‘ही’ लिस्ट पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशव्यापी अनागोंदी माजवली आहे. दररोज 4 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग होत आहे. ही परिस्थिती पाहता बँका आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग वापरण्यास प्रोत्साहित करीत आहेत, तरीही बँकेशी संबंधित काही काम करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, कोणत्या तारखेला बँक हॉलिडे आहेत म्हणजेच बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या प्रत्येक सुट्टीप्रमाणे मे महिन्यात काही खास प्रसंगी बँका बंद राहतील.

सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम
रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या मे 2021 च्या बँक हॉलिडेज लिस्टनुसार मेमध्ये एकूण 12 दिवड बँका बंद राहतील. यामध्ये साप्ताहिक सुट्टीचा समावेश आहे. तथापि, काही सुट्टी आधीच पार पडल्या आहेत. अजून आठ सुट्या बाकी आहेत, म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये बँका 8 दिवस बंद राहतील. RBI च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या सुट्यांच्या लिस्टमध्ये अशा काही सुट्या आहेत ज्या त्या त्या राज्यांच्या स्थानिक पातळीवरच प्रभावी आहेत. सर्व राज्यांमध्ये या सुट्या लागू होणार नाहीत कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकत्रित साजरे होत नाहीत.

येथे पहा, Bank Holidays List –

<< 9 मे: रविवारी (सर्वत्र)

<< 13 मे: रमजान ईद (ईद-उल-फितर). या दिवशी बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुअनंतपुरम येथे बँका बंद असतील.

<< 14 मे: भगवान श्री परशुराम जयंती / रमजान ईद (ईद-उल-फितर) / बसवा जयंती / अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2021) या दिवशी बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरम येथे बँका बंद असतील.

<< 16 मे: रविवार (सर्वत्र)

<< 22 मे: चौथा शनिवार (सर्वत्र)

<< 23 मे: रविवारी (सर्वत्र)

<< 26 मे: बुद्ध पूर्णिमा. या दिवशी अगरतला, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद राहतील.

<< 30 मे: रविवार (सर्वत्र).

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group