हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक महत्वाचे अपडेट आले आहे. जर आपण या बँकेचे ग्राहक असाल आणि अजूनही सेंट्रल केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर आपल्या जवळच्या शाखेत जाऊन लवकरात लवकर हे काम करावे लागेल. जर असे केले नाही तर नंतर आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
सेंट्रल केवायसी म्हणजे काय ते जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, KYC द्वारे बँकेकडून आपल्या ग्राहकांचा डेटा डिजिटल स्वरूपात सेव्ह केला जातो. याआधी वेगवेगळ्या कारणांसाठी ग्राहकांना वारंवार केवायसी करावे लागत होते. मात्र आता सेंट्रल केवायसीद्वारे हा त्रास कमी करण्यात आला आहे. यामुळे आता ग्राहकांना नवीन खाते उघडणे, जीवन विमा खरेदी करणे, डिमॅट खाते उघडणे या सर्व कामांसाठी पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज भासणार नाही. ही प्रक्रिया आता एकदाच करायची आहे. Bank of Baroda
वारंवार केवायसी करण्याच्या त्रासापासून सुटका
हे लक्षात घ्या कि, ग्राहकांना आता सेंट्रल केवायसी हे एकदाच करावे लागेल. याद्वारे, पुन्हा पुन्हा केवायसी करण्याच्या त्रासातून मक्तता मिळेल. सेंट्रल केवायसी केल्यानंतर बँकेकडून ते रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात स्टोअर केले जाईल. तसेच सेंट्रल केवायसीद्वारे बँका आणि इतर संस्थांना केवायसी मानदंडांची पूर्तता झाली की नाही हे तपासण्यात मदत होईल. सेन्ट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन एसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया अर्थात CERSAI द्वारे सेंट्रल केवायसी व्यवस्थापित केले जाते. Bank of Baroda
सेंट्रल केवायसी कसे करावे ???
सेंट्रल केवायसी करण्यासाठी ग्राहकांना जवळच्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जावे लागेल. जिथे सेंट्रल केवायसीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मात्र जर ग्राहकाने सेंट्रल केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर बँकेकडून खाते निष्क्रिय केले जाऊ शकते. Bank of Baroda
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/writereaddata/Images/pdf/CKYC-Declaration-Form-25-11-2020.pdf
हे पण वाचा :
BSNL च्या 87 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा डेली 1GB डेटा
Home Loan ची परतफेड लवकरात लवकर करण्याचा मार्ग जाणून घ्या
Torn Notes : फक्त ‘या’ बँकांमध्येच बदलता येतात फाटक्या नोटा, जाणून घ्या त्यासाठीचे नियम
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर
अमेरिकेतील गोंधळामुळे बँकिंग क्षेत्रातील Mutual Funds मध्ये एका आठवड्यात सहा टक्क्यांनी घसरण