Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. हे असे शेअर्स आहेत ज्याद्वारे गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळतो. अशा शेअर्समध्ये Algi Equipments च्या शेअर्सचा देखील समावेश होतो. हे जाणून घ्या कि, गेल्या 2 दशकात या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणुक केलेले गुंतवणूकदार आज करोडपती बनले आहेत. NSE वर शुक्रवारी (3 मार्च रोजी) या कंपनीचे शेअर्स 2.18 टक्क्यांनी घसरून 467.10 रुपयांवर बंद झाले आहेत.

This multibagger delivered over 300% return in one year; more upside likely  - BusinessToday

Algi Equipments ही एक एअर कंप्रेसर बनवणारी कंपनी आहे. या कंपनीने आता व्हिएतनाममध्येही पूर्ण मालकीची उपकंपनी उघडली आहे. शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीमध्ये या कंपनीने सांगितले की, “या उपकंपनीचे नाव ‘Elgi Compressors Vietnam LLC’ असे ठेवण्यात आले आहे. तसेच 1 मार्च 2023 रोजी तिला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देखील मिळाले आहे.” Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

कंपनी व्हिएतनाममध्ये करणार एअर कॉम्प्रेसरचा व्यवसाय

कंपनीने सांगितले की,” त्यांची उपकंपनी लवकरच व्हिएतनाममध्ये एअर कंप्रेसरचा व्यवसाय सुरु करणार आहे. ज्याअंतर्गत, ते आयात, निर्यात, होलसेल, डिस्ट्रीब्यूशन, कंप्रेसरची किरकोळ विक्री आणि त्याची स्थापना आणि देखभाल यासंबंधी सुविधा देतील. हे जाणून घ्या कि, सुमारे 20 वर्षांपूर्वी NSE वर 13 मार्च 2003 रोजी या कंपनीच्या शेअर्सची प्रभावी किंमत फक्त 4.13 रुपये होती. मात्र आता गेल्या 2 दशकात या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 11, 200 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. Multibagger Stock

This Multibagger penny stock gives over Rs 5 crore returns for Rs 1 lakh  investment in 3 years | Investment: రూ.1 లక్ష ఇన్వెస్ట్ చేస్తే మూడేళ్లలో  రూ.5 కోట్లకు పైనే రిటర్న్స్– News18 Telugu

गुंतवणूकदारांना मिळाले कोट्यवधी रुपये

जर एखाद्याने 20 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या 1 लाख रुपयांचे मूल्य 1.13 कोटी रुपये झाले असते.

गेल्या एका महिन्यात झाली सुमारे 13.28 टक्क्यांनी वाढ

या कंपनीच्या शेअर्सच्या अलीकडील कामगिरीकडे पहिले तर गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये सुमारे 13.28 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येईल. गेल्या एका वर्षात या शेअर्सची गुंतवणूकदारांना 42.69% इतका मजबूत रिटर्न मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षांमध्ये या शेअर्समध्ये 227.67 टक्के वाढ झाली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/elgi-equipments-ltd/elgiequip/522074/

हे पण वाचा :
Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
Amazon Alexa Prime Offer : Alexa च्या वाढदिवसानिमित्ताने ग्राहकांची चांदी, Amazon वरून अर्ध्या किंमतींत घरी आणा ब्रँडेड स्पीकर्स…