Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Stock Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजकाल अनेक लोकं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. फास्ट इंटरनेट, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डीमॅट खात्यांमुळे यामध्ये ट्रेडिंग करणे खूपच सोपे झाले आहे. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करण्याआधी त्याच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी. तर आज शेअर मार्केटमध्ये वापरल्या जाणार्‍या काही शब्दांचे अर्थ जाणून घेणार आहोत.

Market Today Live: Indices rally for sixth consecutive session, Sensex and  Nifty end at new highs

इंट्राडे ट्रेडिंग

जर आपण काही शेअर्सची खरेदी केली असेल आणि ते घेतलेल्या दिवशीच विकले तर अशा प्रकारच्या तात्पुरत्या गुंतवणुकीला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हंटले जाते. यामध्ये शेअर्स खरेदी केल्यानंतर जर त्यांची किंमत कमी झाली तर आपल्याला तोटा होईल मात्र जर वाढ झाली तर ते फायद्याचे ठरेल. Stock Market

अप्पर सर्किट/लोअर सर्किट

हे जाणून घ्या कि, स्टॉक एक्सचेंजकडून प्रत्येक शेअर्सच्या किंमतीसाठी मर्यादा निश्चित केली जाते. एक्सचेंज शेअर्सच्या किंमती एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाउ देत नाहीत. यावेळी किमतीच्या वरच्या मर्यादेला अप्पर सर्किट आणि किमतीच्या खालच्या मर्यादेला लोअर सर्किट असे म्हंटले जाते. Stock Market

How Does the Stock Market Work? | Chase

52 आठवड्यांच्या उच्चांक / निच्चांक

52-आठवड्यांच्या उच्चांक म्हणजे शेअर्स गेल्या 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे. त्याचप्रमाणे, 52 आठवड्यांचा निच्चांक म्हणजे शेअर्सगेल्या 52 आठवड्यांतील खालच्या पातळीवर आहे. Stock Market

बुल मार्केट (तेजी)

हे लक्षात घ्या कि, जेव्हा शेअर मार्केटमध्ये तेजी येते तेव्हा शेअर्सची किंमत वाढते. मात्र जर मार्केट एका ठराविक वेळेमध्ये सतत वरच्या दिशेने गेला तर त्याला बुल मार्केट किंवा मार्केटमध्ये तेजीचे वातावरण आहे असे म्हंटले जाते.

बेअर मार्केट (मंदी)

जेव्हा शेअर मार्केटमध्ये तेजीच्या वातावरणाच्या अगदी विरुद्ध मंदीचे वातावरण असते तेव्हा त्याला बेअर मार्केट असे म्हंटले जाते. जर आपल्याला वाटत असेल कि, येत्या काळात मार्केट खाली जाईल तर त्याबाबत आपण बेअरीश आहात असे म्हंटले जाईल. Stock Market

Best performing stocks for half-year 2021 - Nairametrics

लॉन्ग पोझिशन

लॉन्ग पोझिशन किंवा लॉग होणे हे आपल्या ट्रेडिंगची दिशा दाखवते. जर आपण निफ्टी इंडेक्स वर जाईल या अपेक्षेने तो खरेदी केला असेल तर ही आपली या इंडेक्सवरील लॉन्ग पोझिशन असेल. तसेच, जर आपण इतर कोणतेही शेअर्स किंवा इंडेक्सवर लॉन्ग पोझीशन असेल, तर बुलिश ट्रेडर मानले जाईल.

शेअर्सचे दर्शनी मूल्य

शेअर्सच्या निश्चित किंमतीला दर्शनी मूल्य किंवा फेस व्हॅल्यू असे म्हणतात. हे कंपनीकडूनच ठरवले जाते. जे त्यांच्या कॉर्पोरेट निर्णयांसाठी आवश्यक आहे, जसे की लाभांश किंवा स्टॉक स्प्लिट देताना कंपनी त्या आधारावरच शेअर्सचे दर्शनी मूल्य ठरवते. Stock Market

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/

हे पण वाचा :
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा
Gold Price Today : सोने-चांदीच्या भावात किंचित वाढ, पहा आजचा सोन्याचा दर
Multibagger Stocks : गेल्या 5 दिवसांत ‘या’ कंपन्यांच्या 5 शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिला 43% पेक्षा जास्त रिटर्न
Smart TV Offers : फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, इथे मिळतो आहे जबरदस्त डिस्काउंट