नवी दिल्ली । तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल आणि तुम्हांला पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा एटीएम कार्ड घरी विसरला असेल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. वास्तविक, बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एटीएम/डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देते.
बँकेने या सुविधेला Cash on Mobile असे नाव दिले आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये बँक ऑफ बडोदाचे M-Connect Plus App असणे आवश्यक आहे. या अॅपद्वारे तुम्ही देशातील बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकाल.
बँक ऑफ बडोदा Cash on Mobile Service
>> बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना फक्त BOB M-Connect Plus App उघडणे आणि कार्डलेस ट्रान्सझॅक्शनसाठी OTP जनरेट करणे आवश्यक आहे.
>> सर्वप्रथम M-Connect Plus App वर लॉगिन करा आणि प्रीमियम सर्व्हिसेस टॅबवर टॅप करा.
>> Cash on Mobile Service वर क्लिक करा.
>> आता तुमचा खाते क्रमांक निवडा, रक्कम एंटर करा आणि सबमिट करा.
>> रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर बँक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP पाठवते.
बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मध्ये ‘या’ पद्धतीचा वापर करा
आता तुम्हाला या OTP सह तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर जावे लागेल आणि एटीएम स्क्रीनवर Cash on Mobile पर्याय निवडावा लागेल. आता तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका आणि रक्कम टाका.