हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची आहे. बँकेने नुकतेच मार्जिनल कॉस्ट फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10-15 बेस पॉईंटने वाढ केली आहे. 12 जुलैपासून हे नवीन दर लागू होतील. या दरवाढीनंतर आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. तसेच ग्राहकांच्या मंथली EMI मध्य वाढ झाल्याने बँकेकडून कर्ज घेतलेल्या लोकांचे गणित विस्कटणार आहे. मात्र, इथे हे लक्षात घ्या कि, बँकेने लहान कालावधीसाठीच्या MCLR दरात कोणताही बदल केलेला नाही.
असे असतील नवीन व्याजदर
Bank of Baroda ने एका वर्षाच्या टर्म लोनवरील व्याजदर 7.50 टक्क्यांवरून 7.65 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांच्या कालावधीचा MCLR 7.35 वरून 7.45 टक्के केला आहे. तर 3 महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR 7.25 टक्क्यांवरून 7.35 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्याच्या कालावधीचा MCLR 7.20 टक्के आणि ओव्हरनाईट कालावधीवर 6.80 टक्के लागू आहे. Bank of Baroda या बँकेचा बेस रेट वार्षिक 8.15 टक्के आहे. त्याच वेळी, BPLR (बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट) 12.45 टक्के प्रतिवर्ष आहे.
असे असतील इतर व्याज दर
Bank of Baroda चा रिटेल लोनसाठीचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 7.45 टक्के आहे. हा रेपो दरावर आधारित लेंडिंग रेट आहे. त्यात बँकेचा मार्कअप 2.55 टक्के आहे. बँकेच्या होम लोनसाठी 7.45 टक्के ते 8.80 टक्के दरम्यान आहे. नवीन कार घेण्यासाठी बँकेकडून 7.70 टक्के ते 10.95 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. तसेच, सेकंड हँड कारसाठी बँक 10.20 टक्के ते 12.95 टक्के कर्ज देते. त्याच वेळी, दुचाकी वाहनांसाठी बँक 11.95 टक्के दराने कर्ज देते.
बँक ऑफ महाराष्ट्रने देखील MCLR कमी केला
एक निवेदन जारी करत Bank of Maharashtra ने म्हटले की, यावेळी एक वर्षाचा MCLR 7.70 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, जो बहुतेक कन्झ्युमर लोनसाठी स्टॅण्डर्ड आहे. त्याचप्रमाणे, 6 महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR 0.20 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. तो आता 7.40 टक्के झाला आहे. बँकेने पुढे सांगितले की,” तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दर 0.35 टक्क्यांनी 7.20 टक्क्यांनी कमी केला आहे.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/retail-loans-interest-rates
हे पण वाचा :
Business ideas : ‘या’ रोपांची लागवड करून कोट्यवधी रुपये !!!
Bank of Maharashtra मधून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा, MCLR मध्ये केली कपात
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला 158 टक्के रिटर्न !!!
UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…
ज्येष्ठ नागरिकांच्या Health Insurance क्लेमसाठी जास्त का लागतो ??? यामागील कारणे जाणून घ्या