महिलांची थुंकी पिण्यासाठी केल्या तब्बल 42 हत्या; सुपरपॉवर मिळत असल्याचा केला धक्कादायक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बाली : वृत्तसंस्था – आज जग कितीही पुढे गेले असले तरी लोकांच्या अंधश्रद्धा काही कमी होताना दिसत नाहीत. किती तरी लोक अद्यापही काही गोष्टींना मानतात. या अंधश्रद्धेपायी काही लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागतो. असाच अंधश्रद्धेचा एक प्रकार इंडोनेशियामध्ये समोर आला आहे. यामध्ये एका व्यक्तीने सुपरपॉवर (drink their saliva for superpower) मिळवण्यासाठी तब्बल 42 हत्या केल्या आहेत.

अहमद सुराडजी असे या आरोपी व्यक्तीचे नाव आहे. 59 वर्षांचा सीरिअल किलर अहमद सुराडजी आधी एक गुराखी होता. त्याच्या घराजवळील उसाच्या शेतात बरेच मृतदेह सापडले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हत्या करण्यामागे धक्कादायक कारण सांगितले आहे. त्याने दिलेले कारण ऐकून पोलिसांनासुद्धा हादरा बसला आहे.

आरोपी अहमद सुराडजी याने सांगितले कि, त्याच्या वडिलांचं भूत त्याच्याजवळ आलं आणि स्वप्नात त्यांनी त्याला 70 महिलांची थुंकी (drink their saliva for superpower) पिण्यास सांगितलं. ज्यामुळे तो महाशक्तिशाली बनेल. पण त्यांनी त्यांची हत्या करण्याबाबत सांगितलं नव्हतं. पण यासाठी बरीच वर्षे लागतील असा विचार करून त्याने लवकरात लवकर सुपरपॉवर (drink their saliva for superpower) मिळवण्यासाठी स्वतःच हत्येचा मार्ग निवडला असेदेखील तो म्हणाला. 1986 ते 1997 या कालावधीत त्याने हे हत्याकांड केले आहे. त्याला अटक होईपर्यंत त्याने 42 हत्या केल्या होत्या. यात महिला आणि लहान मुलींचाही समावेश आहे. त्याच्या या कृत्यासाठी 14 वर्षांपूर्वी म्हणजे 10 जून 2008 रोजी मृत्यूदंड देण्यात आला होता. त्यानंतर भररस्त्यात त्याला गोळी मारून मृत्यूदंड देण्यात आला.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

Leave a Comment