Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का, MCLR वाढल्याने आता द्यावा लागणार जास्त EMI

Bank of Baroda
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये Bank of Baroda चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने बँक ऑफ बडोदाने वेगवेगळ्या कालावधीतील MCLR 25 ते 30 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 ते 0.30 टक्क्यांनी वाढवला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे नवीन दर 12 डिसेंबर 2022 पासून लागू होतील.

Bank of Baroda Q1 net profit increases 79.3% to Rs 2,168 crore; NII up 12%  | Business Standard News

BSE च्या फाइलिंग मधील माहितीनुसार, बँकेकडून एक वर्षाचा MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.30 टक्के करण्यात आला आहे. तसेच एक महिन्याचा MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 7.95 टक्के, तीन महिन्यांचा MCLR 0.30 टक्क्यांनी वाढवून 8.05 टक्के, 6 महिन्यांचा MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.15 टक्के करण्यात आणि एक दिवसाचा MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 7.50 टक्के करण्यात आला आहे.

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

bank of baroda: Bank of Baroda looks to ramp up wealth management business  - The Economic Times

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Bank of Baroda

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.Bank of Baroda

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/personal-banking/loans/home-loan/home-loan-interest-rates

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे