Bank Of Baroda मध्ये नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

Bank of Baroda
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईनबँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) पदाच्या एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. 24 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

बँक – बँक ऑफ बडोदा

पद संख्या – 15 पदे

भरले जाणारे पद – वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त संस्थामधून चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा पूर्ण वेळ एमबीए / पीजीडीएम किंवा त्याच्या समतुल्य पूर्णवेळ अभ्यासक्रम… CFA (CFA institute-USA), FRM(GARP), PRM (PRMIA) आणि किमान 5 वर्षे अनुभव असावा.

वय मर्यादा

1 जानेवारी 2023 रोजी 27 वर्षे ते 40 वर्षापर्यंत असावे तसेच SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट

परीक्षा फी – 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला – 100/- रुपये]

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply