हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेकडून आता जास्त व्याज मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कर्ण या बँकेने डोमेस्टिक रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 25 बेस पॉईंट्सनी वाढ केली आहे. 17 मार्च 2023 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
Bank of Baroda ने निवडक मुदतीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी (NRO) अकाउंट आणि नॉन रेसिडेंट एक्सटर्नल (NRE) टर्म डिपॉझिट्सचा समावेश आहे. याबाबत एका निवेदनात बँकेने म्हटले की, 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या डिपॉझिट्सवर हे नवीन दर लागू होतील.
‘या’ योजनांच्या व्याजदरातही झाली वाढ
Bank of Baroda टॅक्स सेव्हिंग टर्म डिपॉझिट आणि बडोदा एडव्हांटेज फिक्स्ड डिपॉझिटवरही व्याजदर वाढवण्यात आले आहेत. आता 3 वर्षे ते 5 वर्षे कालावधीसाठीच्या डिपॉझिट्सवर 6.5 टक्के व्याज मिळणार आहे. तसेच निवासी भारतीय ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे प्रमाण 7.15 टक्के आहे. 5 वर्षे ते 10 वर्षांच्या टर्म डिपॉझिट्सवर 6.5 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के व्याजदर दिला जाईल.
बँकेने डिसेंबरमध्येही रिटेल टर्म डिपॉझिट्सच्या व्याजदरात वाढ
याआधी डिसेंबर 2022 मध्येही Bank of Baroda ने आपल्या रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 65 बेसिस पॉइंट्सने तर नोव्हेंबर 2022 मध्ये 100 बेस पॉईंट्सने वाढ केली होती.
रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता
हे लक्षात घ्या की, मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत कडून रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता एप्रिलमधील एमपीसीमध्येही RBI 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/deposits-interest-rates
हे पण वाचा :
Gold Price Today : गुढीपाढव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोने चमकले, तपासा आजचे नवे दर
रोखीने व्यवहार करत असाल तर वेळीच व्हा सावध अन्यथा मिळेल Income tax डिपार्टमेंटची नोटीस
Realme C35 स्मार्टफोनवर मिळवा आतापर्यंतची सर्वात स्वस्त ऑफर, फीचर्स तपासा
Airtel ची भन्नाट ऑफर, ग्राहकांना मिळणार अनलिमिटेड 5G डेटा
New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न