व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लग्नसमारंभ करून घरी परतणारा पुण्यातील एकजण जीपच्या धडकेत जागीच ठार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत जीपची जोरात धडक बसून पुणे येथील उद्योजक नंदकिशोर रावसाहेब आवारी (वय 55,रा.चंदननगर, खराडी, पुणे) हे जागीच ठार झाले. लग्न समारंभ करून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

याबाबतची घटनास्थळावरुन व शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंदननगर, पुणे येथील उदयोजक नंदकिशोर आवारी हे सातारा जिल्ह्यातील भिलार याठिकाणी एका लग्नासमारंभा करीता पुण्याहून बुलेट (क्रमांक MH 12 LX 7103)आले होते. यावेळी लग्नासमारंभानंतर नंदकिशोर आवारी हे परत पुणे येथे निघाले होते. ते शिरवळ हद्दीत आली असता आले असता पाऊस लागल्याने ते बुलेट महामार्गालगत थांबवून सर्व्हिस रस्त्यावर उभे होते.

यावेळी सर्व्हिस रस्त्यावरुन निघालेली जीप (क्रमांक MH 11 BH 7783) ने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर गंभीर जखमी झालेल्या नंदकिशोर आवारी यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस अंमलदार अरुण पाटणकर, तुषार अभंग हे करीत आहे.