Bank Of Baroda कडून FD वर मिळणार 7.80% पर्यंत व्याज, याचा लाभ कसा घ्यावा ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Of Baroda : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Bank Of Baroda ने ज्येष्ठ नागरिकांच्या FD वरील व्याजदरात 65 बेस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे.

आता Bank Of Baroda कडून ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 7.8 टक्के व्याज दर दिला जाईल. मात्र, हे व्याज बँकेची खास एफडी ‘बडोदा ट्रायकोलर प्लस डिपॉझिट स्कीम’ वर मिळते आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सामान्य एफडीवर जास्तीत जास्त 7.55 टक्के व्याज आणि नॉन-कॉलेबल एफडीवर 0.25 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाते आहे. बँकेची ही योजना 399 दिवसांसाठी आहे. बँकेने सर्व कालावधीतील सामान्य एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Bank of Baroda Q1 net profit increases 79.3% to Rs 2,168 crore; NII up 12%  | Business Standard News

26 डिसेंबर 2022 पासून पासून नवीन दर लागू

Bank Of Baroda च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 26 डिसेंबर 2022 पासून लागू आहेत. आता बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर सर्वसामान्यांना जास्तीत जास्त 6.75 टक्के व्याज देत आहे. विशेष म्हणजे तिरंगा प्लस योजनेमध्ये जास्तीत जास्त व्याजदर दिला जात आहे. मात्र ही मर्यादित कालावधीची FD योजना आहे. यामध्ये 444 दिवस, 555 दिवस आणि 399 दिवस असे तीन टेनर्स असतील. मात्र यामध्ये फक्त 399 दिवसांच्या FD वरच जास्तीत जास्त व्याज दिले जात आहे.

Bank of Baroda launches WhatsApp services. Here's what you need to know -  Hindustan Times

तिरंगा योजनेचे व्याजदर जाणून घ्या

444 दिवसांच्या मुदतीच्या योजनेमध्ये सर्वसामान्यांना 6.75 तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याज मिळत आहे. तसेच 555 दिवसांच्या FD वरही तेच व्याजदर लागू असतील. त्याचबरोबर तिरंगा योजनेच्या 399 दिवसांच्या FD वर सर्वसामान्यांना 7.05 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याज मिळत आहे. जर ही FD नॉन-कॉलेबल केली तर 399 दिवसांच्या तिरंगा योजनेवर सामान्य नागरिकांना 7.30 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के व्याज मिळेल. बँकेने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

सामान्य एफडीवरील व्याजदर जाणून घ्या

बँक ऑफ बडोदाकडून सामान्य एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 3% ते 6.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 6.75% पर्यंतचा व्याज दिला जातो आहे. हे लक्षात घ्या कि, 1 वर्ष, 1 वर्ष आणि 400 दिवसांपेक्षा जास्त, 400 दिवस ते 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर जास्तीत जास्त व्याज मिळते आहे. तसेच या मुदतीवर बँकेकडून सर्वसामान्यांना 6.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75% व्याज दिले जात आहे. गेल्या महिन्यातच बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात 100 बेस पॉइंट्स किंवा 1 टक्क्यांनी वाढ केली होती.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/deposits-interest-rates

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये