Tuesday, June 6, 2023

Bank Of India च्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 7.75% व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Of India : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Bank Of India ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Bank of India Slips for Fifth Straight Session - Equitypandit

01 नोव्हेंबर 2022 पासून नवीन दर लागू

Bank Of India च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 01 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदलानंतर आता बँकेकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्ष कालावधीच्या डिपॉझिट्सवर 2.85% ते 5.75% पर्यंतचा व्याजदर दिला जाईल.

FD वर मिळणार 7.75% व्याज

Bank Of India ने आज “स्टार सुपर ट्रिपल सेव्हन फिक्स्ड डिपॉझिट” नावाची योजना जाहीर केली आहे. ज्याअंतर्गत 7.75% पर्यंत व्याज दिले जात आहे. आता बँक 777 दिवसांच्या FD वर सर्वसामान्यांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर देत आहे.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

नवीन व्याज दर

आता बँकेकडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 2.85%, 46 ते 179 दिवसांच्या FD वर 3.85%,180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.60%, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या (555 दिवस वगळून) FD वर 5.75% व्याजदर दिला जाईल.

बँक ऑफ इंडिया 555 दिवसांच्या FD वर 6.30% व्याज दर दिला जाईल. आता बँकेकडून 2 वर्षे ते 3 वर्षांसाठी (777 दिवस सोडून) 5.75% व्याज दर मिळेल. 777 दिवसांच्या FD वर आता 7.25%, 3 वर्षे ते 5 वर्षांच्या FD वर 6.25%, 5 ते 10 वर्षांच्या FD वर 5.75 टक्के दराने व्याज मिळेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank Of India

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofindia.co.in/RupeeTermDeposit

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा