Wednesday, February 8, 2023

Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात अनेक चढ-उतार पहायला मिळत आहेत. मात्र, इतर बाजारांच्या तुलनेत सध्या भारतीय बाजार मजबूत स्थितीत दिसत आहे. बाजारात गुंतवणुकीचे एकमेव उद्दिष्ट चांगला रिटर्न मिळवणे आहे. मात्र, फिनिओटेक्स केमिकल या केमिकल स्टॉकनेही गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. या कंपनीमध्ये पैसे टाकणाऱ्यांना वर्षभरातच साडेतीन पट रिटर्न मिळाला आहे. या कालावधीत कंपनीने 225 टक्के रिटर्न दिला असून दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनीही या कंपनीच्या शेअर्सची खरेदी वाढवली आहे.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

- Advertisement -

हे लक्षात घ्या कि, 13 सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला. यावेळी त्याची किंमत प्रति शेअर 409.45 रुपये झाली. मात्र, गेल्या महिनाभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये नफावसुली सुरू असून, त्यामुळे ते त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून 7 टक्क्यांनी खाली आले आहेत. जून 2022 मध्ये, आशिष कचोलिया यांनी या स्टॉकमध्ये फक्त 1.9 टक्के हिस्सा घेतला होता, जो सप्टेंबरपर्यंत 2.6 टक्के झाला आहे. Multibagger Stock

multibagger penny stock tanla platforms ltd share gives 23000 percent returns in just 10 years– News18 Telugu

कंपनीची कामगिरी कशी होती???

2022 मध्ये कंपनीच्या शेअर्सने सुमारे 177 टक्के रिटर्न दिला आहे. 27 ऑक्टोबर रोजी या शेअर्सची किंमत प्रति शेअर 382.60 रुपये झाली होती. त्याची मार्केटकॅप सध्या 4,237 कोटी रुपये आहे. कंपनीने अलीकडेच बाजार नियामकाला सांगितले होते की,” चांगले तिमाही निकाल आणि चांगल्या व्यवसाय विस्तार धोरणामुळे त्यांच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही ज्याचा बाजारातील शेअर्सवर परिणाम होईल. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 11.44 कोटी रुपये होता.” Multibagger Stock

Multibagger stock: Bumper 6500% returns on investment in few years – Here's how

कचोलियाचे किती शेअर्स आहेत???

दिग्गज गुंतवणूकदार असलेल्या आशिष कचोलिया याच्याकडे सध्या या कंपनीच्या शेअर्सचा 2.64 टक्के हिस्सा आहे. याचा अर्थ आशिषकडे 29,24,072 शेअर्स आहेत आणि ते त्याच्या पोर्टफोलिओच्या मुख्य कंपन्यांमध्ये सामील झाले आहेत. आशिषच्या पोर्टफोलिओमध्ये 40 कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांचे मूल्य 1,831.4 कोटी रुपये आहे. आशिषच्या आवडत्या कंपन्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, इन्फ्रा, मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रातील शेअर्सचा देखील समावेश आहे. Multibagger Stock

Dye + Chem Dhaka, Bangladesh - Fineotex : Fineotex

Finiotex विषयी जाणून घ्या

ही केमिकल कंपनी टेक्‍सटाइल, कंस्‍ट्रक्‍शन, वॉटर ट्रीटमेंट, खते, चामडे आणि पेंट इंडस्ट्रीसाठी केमिकल तयार करते. हे प्री-ट्रीटमेंट प्रोसेस, डाईंग प्रोसेस, प्रिंटिंग आणि फिनिशिंग प्रोसेससाठी केमिकल पुरवते. त्याच्या व्यवसायाचा विस्तार फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहे. कंपनीच्या ठोस रणनीतीमुळे, त्याच्या व्यवसायाच्या विस्ताराची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच दिग्गज गुंतवणूकदारही यामध्ये आपली हिस्सेदारी वाढवत आहेत. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://fineotex.com/

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा