हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दहावी पास आहात? सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक आहात? तर मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे . कारण 10 वी पास उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडिया मध्ये बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून या भरती प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी तुम्हाला दहावी पास असणे गरजेची आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी :
बँक ऑफ इंडिया ने नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दल अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार सदर उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2024 असून या तारखे नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत असे अधिसूचनेत स्पष्ट दर्शवण्यात आले आहे. भरतीची विशेषता म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची कुठलीही सोय देण्यात आलेली नाही.
भरती प्रक्रिया 8 जागांसाठी :
बँक ऑफ इंडिया मध्ये दहावी पास असणारे उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली असून याद्वारे सरकारी नोकरी करण्याची संधी प्राप्त होऊ शकणार आहे. बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया 8 जागांसाठी सुरू आहे. यामध्ये विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त हे 62 असावे. त्याशिवाय या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार नाहीये.
भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन : बँक ऑफ इंडियातील भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन असल्यामुळे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, हजारीबाग विभागीय कार्यालय, साकेतपुरी, वेल्स ग्राउंड जवळ, सदानंद मार्ग, हजारीबाग येथे अर्ज पाठवावे लागतील.