हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Maharashtra च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मान्सून ऑफर लाँच केली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना स्वस्त दरात कार लोन आणि होम लोनचा लाभ मिळणार आहे. हे जाणून घ्या कि, 1 ऑगस्ट 2022 पासून या बँकेकडून ‘रिटेल बोनान्झा-मान्सून धमाका’ ऑफर लाँच करण्यात आलीआहे. बँकेकडून महा सुपर होम लोन आणि महा सुपर कार लोन योजनांसाठी संपूर्ण प्रोसेसिंग फी माफ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्याच्या सणासुदीच्या काळात Bank of Maharashtra ने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर लाँच केल्या आहेत. आता बँकेकडून होम लोन आणि कार लोनसाठी अनुक्रमे 7.30% आणि 7.70% पासून व्याजदर दिला जात आहे. बँकेकडून रिटेल प्रॉडक्ट्ससह अनेक आकर्षक फीचर्स देखील ऑफर केले जातात जसे की होम लोनच्या नियमित परतफेडीवर तीन फ्री ईएमआय, कार आणि होम लोनमध्ये 90% पर्यंत कर्जाची सुविधा, कोणतेही पार्ट टाइम चार्ज, प्री क्लोजर चार्ज आणि प्री पेमेंट चार्ज नाही इ.
गोल्ड लोनवरही मिळणार फायदा
Bank of Maharashtra कडून 3 लाखांपर्यंत झिरो प्रोसेसिंग फीससह 7.70% आकर्षक व्याज दराने 25 लाख रुपयांपर्यंतच्या गोल्ड लोनची सुविधा देखील दिली जात आहे. 15 मिनिटांत गोल्ड लोन मिळावे यासाठी बँकेकडून विविध शाखांमध्ये एक खास काउंटर ‘गोल्ड लोन पॉइंट्स’ लाँच केले आहेत.
ग्राहकांना जास्त बचत करण्यात मदत होईल
Bank of Maharashtra चे एमडी आणि सीईओ ए. एस.राजीव यांनी सांगितले कि, “आम्ही आमच्या रिटेल ग्राहकांना अत्यंत आकर्षक किंमती ऑफर करत आहोत. ‘रिटेल बोनान्झा – मान्सून धमाका’ ही ऑफर ग्राहकांसाठी आइसिंग ऑन दी केक असेल ज्यामुळे यंदाच्या उत्सवात जास्त बचत होण्यात मदत होईल.”
कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग फीस माफ झाल्यामुळे ग्राहकांचा फायदा
Bank of Maharashtra चे कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार म्हणाले कि, “यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी मान्सून धमाका ऑफरसह, आम्ही आमच्या ग्राहकांना होम आणि कर लोन मिळविण्याची एक आकर्षक संधी देऊ इच्छितो, ज्यामुळे कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग फीस माफीचा फायदा होईल.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://bankofmaharashtra.in/writereaddata/documentlibrary/e1730cad-e5db-493a-83bd-29407c220611.pdf
हे पण वाचा :
QR Code म्हणजे काय ??? अशा प्रकारे जाणून घ्या
Mobile phone ची बॅटरी लाईफ कशी वाढवायची ते समजून घ्या
Home Loan वर किती टॉप अप लोन मिळवता येईल ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या
Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण, नवीन भाव तपासा