हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । फिक्स्ड डिपॉझिट हे गुतंवणूकीचे सर्वांत लोकप्रिय साधन आहे. याद्वारे आपली गुंतवणूक तर सुरक्षित राहतेच मात्र त्याबरोबरच आपल्याला गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतो. फिक्स्ड डिपॉझिट (FD) प्रमाणेच रिकरिंग डिपॉझिट (RD) मध्येही गुंतवणूक करता येते. ते FD सारखेच असते. मात्र यामधील एक गोष्ट अशी कि आपल्याला RD मध्ये दर महिन्याला पैसे जमा करता येतात. FD मध्ये तसे करता येत नाही. FD मध्ये एकरकमी पैसे जमा करावे लागतात.
आता RD मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी आपल्याला हे एकदा पहावे लागेल कोणती बँक यावर जास्त रिटर्न देत आहे. यामधील कालावधीचा विचार केला तर ते तीन ते पाच वर्षांमध्ये यावर जास्त रिटर्न मिळतो. यावरील रिटर्न हे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकामध्ये वेगवेगळे आहेत. चला तर मग विविध बँकांमधील RD चे दर पाहुयात…
HDFC Bank RD
HDFC बँकेच्या RDमध्ये आपल्याला 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल. तसेच यानंतर आपल्याला 100 च्या पटीने गुंतवणूक सुरू ठेवता येईल. HDFC यामध्ये 6 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.5 टक्के ते 5.60 टक्के व्याजदर आहेत.
ICICI Bank RD
ICICI, बँकेच्या RD मध्ये पैसे ठेवण्यावर आपल्याला 3.50 ते 5.60 टक्के व्याजदर मिळतो.
SBI RD
SBI बँकेच्या RD चे व्याजदर सामान्य नागरिकांसाठी 5.1 टक्के ते 5.5 टक्के आहेत. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यावर अर्धा टक्का जास्त मिळतो आहे.
Post Office RD
पोस्ट ऑफिसमध्ये आपण फक्त 10 रुपयांध्ये RD सुरु करू शकतो. यामध्ये 5 वर्षांचा मॅच्युरिटी पिरियड असतो. यानंतर आपल्याला 5 च्या पटीने गुंतवणूक सुरू ठेवता येईल. यामध्य गुंतवणूकीचे कोणतेही लिमिट नाही. यावर सध्या, वार्षिक 5.8% व्याज मिळतो आहे (तिमाही चक्रवाढ).जो सरकार डकवून निश्चित केला जातो.