बँका बंद!! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : खाजगीकरणाच्या विरोधात 9 बँक अधिकारी कर्मचारी संघटनांनी आजपासून दोन दिवस संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आज शहरासह जिल्ह्यातील जवळपास दोनशे बँकांचे कामकाज ठप्प झाले. सलग तिसऱ्या दिवशी बँका बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र मोठे हाल झाले. जिल्ह्यात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँका च्या खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. याविरोधात कर्मचारी-अधिकारी बँक संघटनांच्या युनायटेड फोरमने आज (दि.15-16) आणि उद्या असे दोन दिवस संपाची हाक दिली आहे. शनिवार रविवार या दोन दिवसाच्या सुट्ट्या नंतर लगेच संपाचे हत्यार उपसले गेल्याने बँका बंदचा आजचा सलग तिसरा दिवस आहे, त्यामुळे ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली. महत्त्वाच्या एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र यासह जवळपास 12 सरकारी बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्याच बरोबर 12 जुन्या खाजगी बँका सहा विदेशी त्याचबरोबर राज्यभरातील जवळपास 56 ग्रामीण बँक आज बंद आहेत राज्यभरातील जवळपास पन्नास हजार अधिकारी कर्मचारी संपावर गेले. याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.

खाजगीकरण विरोधात वाटली पत्रके….

दरम्यान ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, इंडिया बँक ऑफिसर्स फेडरेशन , इंडियन नॅशनल बँक एम्पलॉइज फेदरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र टाऊन सेंटर येथील चौकात खाजगीकरण याविरोधात पत्रके वाटप केली. केंद्र सरकारचे खाजगीकरणाचे धोरण चुकीची असल्याची बाब ग्राहकांना समजावी यासाठी माहिती पत्रकाचे वाटप करण्यात येत असल्याचे तुळजापूरकर यांनी सांगितले.त्याबरोबर शहरातील प्रत्येक शाखेच्या बाहेर उभे राहून कर्मचारी ग्राहकांना पत्रके वाटत आहेत. त्याबरोबर शहरातील चौकाचौकात बँक अधिकारी कर्मचारी खाजगीकरणा विरोधात जनजागृती करत आहेत.

जिल्ह्यात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प….

बँक अधिकारी कर्मचार्‍यांच्या संपाने जिल्ह्यातील जवळपास 200 हून अधिक बँक शाखा बंद आहेत. परिणामी चेक वाटणे यासह पैशाचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यात कोट्यवधींचे व्यवहार संपामुळे ठप्प झाले आहेत. तर जवळपास तीन हजार अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे. एकंदरीत या संपामुळे जिल्ह्याची आर्थिक उलाढालच थांबली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment