मे महिन्यात 12 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण List

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या एप्रिल महिना संपणार असून मे महिना सुरु होणार आहे. तत्पूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील हे सांगितलं आहे. मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे तुमची बँकेशी निगडित जी काही कामे आहेत ती लवकरात लवकर उरकून घ्या आणि योग्य प्रकारे कामाचे नियोजन करा. बँकाच्या सुट्ट्या या राज्यानुसार वेगवेगळ्या असतात. खाली आम्ही तुम्हाला राज्यानुसार सुट्ट्यांची संपूर्ण यादी देत आहोत.

1 मे 2023- या दिवशी महाराष्ट्र दिन आणि मे दिन असून त्यानिमित्ताने गुवाहाटी, बेलापूर, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि त्रिवेंद्रम या राज्यातील बँका बंद राहतील.

5 मे 2023- या दिवशी बुद्ध पौर्णिमा असून त्यानिमित्ताने आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी आहे.

9 मे 2023- या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती असून त्या पार्श्वभूमीवर कोलकातामध्ये बँक बंद असेल.

16 मे- 2023 – हा दिवस सिक्कीमचा राज्य दिन असून त्यादिवशी सिक्कीम मध्ये बँका बंद राहतील

22 मे 2023 – या दिवशी महाराणा प्रताप यांची जयंती असून हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमधील बँक बंद असतील.

24 मे 2023- या दिवशी काझी नजरुल इस्लाम जयंती निमित्ताने फक्त त्रिपुरामध्ये बँकांना सुट्टी असेल.

साप्ताहिक सुट्टी

7 मे: रविवार
13 मे: दुसरा शनिवार
14 मे: रविवार
21 मे: रविवार
27 मे: चौथा शनिवार
28 मे: रविवार

बँकांना सुट्टी असली तरी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच मोबाईल किंवा नेट बँकिंगद्वारे तुमची कामे पूर्ण करू शकता तसेच UPI च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकता. परंतु काही मोठ्या कामांसाठी किंवा NFT इत्यादीसाठी मात्र ग्राहकांना बँकेत जावे लागेल.