हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून आतापर्यंत चार वेळा रेपो दरात करण्यात आली आहे. ज्यामुळे बँकांकडून कार, होम लोनसहित इतर सर्व प्रकारची कर्जे घेणे महागले आहे. मात्र याबरोबरच एफडीवरील व्याजदर वाढले आहेत. ज्याचा फायदा ग्राहकांना मिळत आहे. एकीकडे रेपो दर 5.90 टक्क्यांपर्यंत वाढलेला असतानाच बँकांचे एफडीवरील व्याजदरही 7 टक्क्यांच्या पुढे गेले आहेत. मात्र, हे लक्षात घ्या कि, सर्वच बँकांकडून इतका व्याजदर दिला जाणार नाही. चला तर मग आज आपण एफडीवर 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर देणाऱ्या बँकांबाबतची माहिती जाणून घेउयात…
बंधन बँक
या बँकेकडून 18 महिन्यांपेक्षा जास्त ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळेल. याशिवाय 2 वर्षांपेक्षा कमी आणि 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर बँकेकडून अनुक्रमे 7 टक्के आणि 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. हे नवीन व्याजदर 22 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. FD Rates
आरबीएल बँक
आरबीएल बँकेकडून 15 महिन्यांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळेल. तसेच 15 महिने 1 दिवस ते 725 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरही हाच व्याजदर दिला जात आहे. याशिवाय, बँक 725 दिवसांच्या FD वर सामान्य नागरिकांना 7.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. तसेच बँक आता 726 दिवसांपासून 24 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य नागरिकांना 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज देत आहे. FD Rates
IDFC बँक
या बँकेकडून 750 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. 10 ऑक्टोबरपासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. FD Rates
कॅनरा बँक
सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने देखील नुकतेच आपल्या व्याजदरात वाढ केली गेली आहे. ज्यानुसार आता बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 666 दिवसांच्या एफडीवर 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. तसेच या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7 टक्के दराने व्याज मिळत आहे. FD Rates
स्मॉल फायनान्स बँका
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 88 दिवसांच्या एफडीवर 7.32 टक्के व्याज देत आहे. उज्जीवनमध्ये 525 आणि 990 दिवसांच्या एफडीवर 7.5 टक्के आणि फिनकेअरमध्ये1000 दिवसांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. याशिवाय सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 999 दिवसांच्या एफडीवर 7.49 टक्के व्याज देत आहे आणि जना स्मॉल फायनान्स बँक 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.35 टक्के व्याज देत आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.equitasbank.com/fixed-deposit- applynow.php?q=fd
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Whatsapp आणणार नवं फीचर्स; ग्रुप मेम्बर्सची संख्या 1024 होणार
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा
Bajaj Finance ने FD व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा