हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात सातत्याने वाढ केली जात आहे. आतापर्यन्त यामध्ये पाच वेळा वाढ करण्यात आली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी असे केले जात असल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे. ज्यानंतर आता बँकांकडूनही आपल्या एफडी आणि बचत खात्यांसोबत विविध बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ नवीन वर्षातील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही सुरूच आहे. आताही अनेक बँकांनी आपल्या ₹2 कोटीपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर वाढल्याची घोषणा केली आहे. याबरोबरच फेब्रुवारी 2023 मध्ये देखील RBI कडून आणखी दरवाढ जाहीर केली जाईल असा अंदाज काही आर्थिक विश्लेषक व्यक्त करत आहेत.
हे लक्षात घ्या कि, पंजाब अँड सिंध बँकेने 1 जानेवारी रोजी FD वरील व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता बँक सध्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.80% ते 6.25% व्याज देईल तसेच 601 दिवसांच्या कालावधीसाठी 7% व्याज दर देत राहील. FD Rates
1 जानेवारी रोजी पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या बचत खाती आणि फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली गेली आहे. यावेळी PNB ने बचत खात्यावरील व्याजदरात 25 बेस पॉईंट्सने तर FD वरील व्याजदरात 50 बेस पॉईंट्सने वाढ केली आहे. यानंतर आता बँक FD वर 4 ते 8% व्याजदर देईल. FD Rates
1 जानेवारी रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेने देखील 7 ते 90 दिवसांच्या अल्प-मुदतीच्या FD वरील व्याजदरात 75 बेस पॉईंट्सने वाढ केली. तसेच बँकेकडून सध्या 444 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 6.55% व्याज दर दिला जातो आहे. त्याच प्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त दर अनुक्रमे 0.50% आणि 0.75% वर राहतील. FD Rates
3 जानेवारी 2023 रोजी येस बँकेने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात बदल करण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता बँक सर्वसामान्य नागरिकांना 3.25% आणि 7.00% दरम्यान तर ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 120 महिन्यांपर्यंतच्या FD वर 3.75% ते 7.75% व्याज दर देत राहील.
कोटक महिंद्रा बँकेने 4 जानेवारी 2023 रोजी आपल्या बचत योजनांवरील व्याजदरात 50 बेस पॉईंट्सने वाढ केली. यानंतर आता 390 दिवस ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर, बँकेकडून आता सर्वसामान्यांना जास्तीत जास्त 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज दर दिले जाईल. FD Rates
बंधन बँकेने 5 जानेवारी 2023 रोजी FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सध्या बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.00% ते 5.85% ऑफर दिली जात आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी ते व्याजदर 3.75% ते 6.60% पर्यंत असतील. आता बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 8% व्याज दर देईल. FD Rates
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit-rate.html
हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
TAN Card म्हणजे काय ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या