हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या या घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी होमलोन हा मोठा आधार ठरतो. त्यामुळेच होमलोनसाठी खूप जास्त मागणीआहे. मात्र हे लक्षात घ्या कि, RBI कडून नुकतेच रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या होमलोन वरील व्याजदरात वाढ केली आहे.
RBI ने रेपो दरात केलेल्या वाढीमुळे सध्या रेपो दर 4.9 टक्क्यांवर आला आहे. 1 ऑक्टोबर 2019 नंतर घेतलेले बहुतेक Home Loan हे बाह्य बेंचमार्कशी जोडलेली असतात, जो बहुतेक प्रकरणांमध्ये रेपो दर असतो. त्यामुळेच रेपो दरात वाढ झाल्यामुळे होमलोनही महागले आहेत. चला तर मग कोणत्या बँका 75 लाख रुपयांच्या होमलोनवर 20 वर्षांच्या कालावधीसाठी कमी व्याजदर देत आहेत ते जाणून घेऊयात …
बँक ऑफ बडोदा : जर बँक ऑफ बडोदाकडून 20 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचे Home Loan घेतले तर वार्षिक 7.45 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. या बॅन्केडून कडून घेतलेल्या कर्जासाठी 60,190 रुपये EMI भरावा लागेल.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया : या दोन्ही बँका 20 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचे Home Loan 7.3 टक्के वार्षिक व्याज दराने देत आहेत. या दोन्ही बँकांकडून होमलोन घेतल्यास 59,506 रुपयांचा EMI भरावा लागेल.
पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक आणि युको बँक : या सर्व बँकांचा व्याजदर 7.5 टक्के आहे. हा दर 75 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या Home Loan साठीचा आहे. या कर्जाचा EMI 59,962 रुपये असेल.
इंडियन ओव्हरसीज बँक : एका रिपोर्ट्सनुसार, या बँकेकडून सध्या देशातील सर्वात कमी व्याजदरावर 20 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचे Home Loan मिळत आहे. या बँकेकडून वार्षिक 7.15 टक्के दराने व्याज आकारला जात आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : सेंट्रल बँक ऑफ इंडिया सध्या 75 लाख रुपयांच्या Home Loan वर 20 वर्षांच्या कालावधीसह 7.2 टक्के व्याज आकारत आहे. या कर्जाचा EMI 59,051 रुपये असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/home-loan-interest-rate.html
हे पण वाचा :
Medicine : ‘या’ 19 औषधांवर केंद्र सरकारकडून बंदीची टांगती तलवार !!!
Nazara Tech. च्या शेअर्सद्वारे मोठ्या कमाईची संधी, गेल्या 5 सत्रांमध्ये झाली 40 टक्क्यांनी वाढ
Kisan Credit Card द्वारे स्वस्त दराने कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज नरमाई !!! नवीन दर तपासा
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार Netflix, Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन !!!