Thursday, October 6, 2022

Buy now

फेब्रुवारीमध्ये बँका 12 दिवस बंद राहणार; पहा सुट्ट्यांची पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली । वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. जानेवारीतही 16 दिवसांची सुट्टी होती. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. मात्र, फेब्रुवारी महिन्यात देशातील सर्वच बँका 12 दिवस बंद राहणार नाहीत.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. फेब्रुवारी महिन्यात येणार्‍या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात. त्यामुळे, बँकेच्या सुट्ट्या राज्यांनुसार बदलू शकतात. सुट्ट्यांची लिस्ट पाहूनच बँकेत जाण्याचे प्लॅनिंग करा. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही बुधवारी म्हणजेच 26 जानेवारीला बँका बंद राहतील.

सुट्ट्यांची लिस्ट खालील प्रमाणे आहे
2 फेब्रुवारी : सोनम लोचर (गंगटोकमध्ये बँका बंद)
5 फेब्रुवारी: सरस्वती पूजा/श्री पंचमी/बसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
6 फेब्रुवारी : रविवार
12 फेब्रुवारी: महिन्याचा दुसरा शनिवार
13 फेब्रुवारी : रविवार
15 फेब्रुवारी: मोहम्मद हजरत अली वाढदिवस/लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनौमध्ये बँका बंद)
16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)
18 फेब्रुवारी: डोलजात्रा (कोलकात्यात बँका बंद)
19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)
20 फेब्रुवारी: रविवार
26 फेब्रुवारी: महिन्याचा चौथा शनिवार
27 फेब्रुवारी : रविवार