आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांमध्ये बँका राहणार बंद, बँकेत जाण्यापूर्वी संपूर्ण लिस्ट तपासा

Bank Holiday
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजपासून पुढील 5 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या लिस्टनुसार या सुट्ट्या जारी केल्या जातात. त्यामुळे तुमचे बँकेचे कोणतेही काम असेल तर ते पुढील आठवड्यासाठी पुढे ढकलावे लागेल.

RBI ने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार, असे काही दिवस आहेत जेव्हा काही विशिष्ट भागात सण किंवा वर्धापन दिनानिमित्त बँका उघडणार नाहीत. RBI कॅलेंडरनुसार, बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार भिन्न असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिन्यात सुट्ट्यांची मोठी लिस्ट आहे.

आता बँकेच्या शाखेशी संबंधित महत्त्वाची कामे करा
RBI ने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या लिस्टनुसार, तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा करा. याच्या मदतीने तुम्ही पुन्हा शाखेत जाणे, कामात अडकणे यासारख्या समस्या टाळू शकता. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सवाने होत आहे. यानंतर, 3 नोव्हेंबरला म्हणजेच आज नरक चतुर्दशीला केवळ बंगळुरूमध्ये बँकांमध्ये कोणतेही सामान्य कामकाज होणार नाही. 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबरला रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुट्ट्या…
3 नोव्हेंबर – बुधवार – नरक चतुर्दशीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
4 नोव्हेंबर – गुरुवार – आगरतळा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोची, मुंबई, नागपूर, लखनौ यांसारख्या शहरांमध्ये दिवाळी आणि काली पूजनामुळे बँका बंद राहतील.
5 नोव्हेंबर – शुक्रवार – गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, डेहराडून येथे बँका बंद राहतील.
6 नोव्हेंबर- शनिवार- भाई दूजच्या गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
7 नोव्हेंबर – रविवारची सुट्टी.