सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने सातारा शहरातील विकास कामांचा श्रेयवाद उफाळून आला आहे. खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावर ‘गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी’ CRF निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या 15 कोटीच्या मार्गाचा शुभारंभ 22 तारखेला घेणार असल्याचे बॅनर लावले. या त्यांच्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीने त्याच्या बाजूलाच थेट बॅनर लावत काम कुणाचं आणि नाचतय कोण ? असा प्रश्न विचारत कधी तरी खरं बोला असा बॅनर लावला असल्याने बॅनरवाॅर सुरू झाले आहे.
सातारा नगरपालिकेची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे सातारा शहरात विकासकामांचा सत्ताधारी गटाकडून लावला आहे. मात्र या विकासकामांची मागणी व मंजूरी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्याचे विरोधी गटाकडून बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे या बॅनर वर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार हे काम नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचे पत्रच या बॅनर वर छापले आहे त्यामुळे त्यामुळे आता हा बॅनर बघण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. या बॅनरवाॅरमुळे सातारा शहरात निवडणुकीपूर्वीच गरमागरमीचे वातावरण पहायला मिळत आहे.
नगरपालिकेतील सविआ आणि नविआ याच्यातील सत्तासंघर्ष नेहमीच जिल्ह्याने पहायला मिळाला आहे. दोन्ही राजे नेहमीच एकमेकांच्या विरोधात नगरपालिकेच्या निवडणुकीतील उभे असतात. सध्या दोन्ही राजे भाजपामध्ये आहेत. तरीही सध्याच्या परिस्थितीवरून दोन्ही गट पक्षविरहीत एकमेकांसमोर निवडणुकीस सामोरे जातील अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.