नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी; चिंचवड मधील बॅनर चर्चेत

banners in pimpari chinchwad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. यातील चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून नानासाहेब काटे यांना तिकीट देण्यात आलं. त्यांनतर नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करूनही राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्याने महाविकास आघाडीला नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता चिंचवड परिसरातील बॅनरने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतलं आहे. यामध्ये राहुल कलाटे यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

बॅनरवरील मजकुर नेमका काय?

एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून… नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दरी, एकदम ओक्के डोक्यातून… खरा शिवसैनिक या आशयाचा मजकूर लिहून राहुल कलाटे यांना विरोध दर्शविला आहे. हे बॅनर नेमकं कोणी लावले हे समोर आलेलं नाही. मात्र शिवैनिकांमध्ये राहुल कलाटे यांच्या भूमिकेमुळे नाराजी असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे.

कलाटे यांच्या बंडखोरीमागे तिसराच सूत्रधार ?

दरम्यान, राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमागे तिसराच कोणीतरी सूत्रधार असल्याची शंका राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली होती. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी करण्यामागचा सूत्राधार कोणतरी तिसराच दिसतोय. मतांचे विभाजन करण्यासाठी हे केल्याचं दिसून येतेय. मात्र महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करणार आहे असं अजित पवार म्हणाले.