सहलीला जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनींच्या बसचा अपघात; 27 मुली जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती : हॅलो महाराष्ट्र्र – पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून, 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. इचलकरंजी येथील सागर क्लासकडून विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन करण्यात आलं होते. ही सहल औरंगाबाद आणि शिर्डी अशी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिर्डी येथून परत इचलकरंजीकडं जाताना बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावात या बसचा अपघात झाला. या अपघातातील जखमी विद्यार्थीनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
इचलकरंजी येथील सागर क्लासकडून सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद आणि शिर्डी अशी ही सहल आयोजित करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थीनी यशोदा ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत होत्या. शिर्डीवरून इचलकरंजीकडं जाताना बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावाजवळ हा अपघात (accident) झाला. या भीषण अपघातात (accident) 24 मुली किरकोळ व 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी या बसमध्ये या बसमध्ये एकूण 48 मुली व 5 शिक्षक प्रवास करत होते.

हा अपघात (accident) नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकलेले नाही. मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या अपघातामध्ये एकूण 27 मुली जखमी झाल्या असून, त्यापैकी तीन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..